आलेख्य
चक्रव्युह
चक्रव्युह
“साहेब, शेट्टी आज रात्री मुंबईत येत आहे, दुबई वरून. रात्रि साकी बार मध्ये गाठा त्याला…पक्की खबर आहे.” शिवा.
“शेट्टीला हात लावायची order नाही. दूसरी काही खबर असेल तर बोल.” इंस्पेक्टर सावंत.
“साहेब पण शेट्टी वरील केसेस जाम भयंकर आहेत. आणि आता निसटला तर पुन्हा नाही सापडायाचा.” शिवा.
“It is none of your business. दूसरी काही खबर ? ” इंस्पेक्टर सावंत.
“सांगतो साहेब. आज रात्री भाऊ गावकर येणार आहे.रमनलाल शेठ जाम नाटक करतोय.त्याचा game करायला. आज त्याच्या पंटर लोकांनी fielding लावली आहे. आईला भेटायला पहिले घरी जाणार आहे.मग पक्या च्या घरी पंटर लोकाना भेटून, सेठचा game करून लगेच गोवा return.म्हातारीला भेटायला जाणार तेव्हाच गाठा त्याला.” शिवा.
“खबर पक्की आहे ना ?”  इंस्पेक्टर सावंत.
“बस का साहेब.” शिवा.
“ठीक आहे.चल ठेव आता” इंस्पेक्टर सावंत.
शिवा भोसले….भोसले परिवारातील शेंडफळ….वडिल रेल्वेत वर्ग-३ कर्मचारी. मुंबई हे नौकरीचे ठिकाण. Railway quarters मध्ये वास्तव्य.
श्री भोसल्याना ४ अपत्ये. ३ थोरल्या मुली आणि आपला शिवा धाकटा. भोसल्याना शिवाला फार शिकवायचे होते. शिवाही हुशार होता. भोसल्यानी आपल्या तिघी मुलीना professional courses ला न टाकता BSC / BCOM करायला लावून त्यांची लग्ने उरकली. भोसल्याना T.B. चा त्रास होता. त्यातच एकदा दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यु झाला. औषधांवर सगळी savings खर्च झाली. म्हणून शिवानेही इंजीनियरिंग न करता BSC करून आपले शिक्षण थांबवले. आई चार घरची धुनी भांडी करत घर चालवत होती. शिवानेही नौकरीसाठी बऱ्याच खेटया घातल्या. शेवटी नौकरी आपल्या नशिबात नाही असे गृहीत धरून कोणा एका भैय्याची taxi रात्रपाळी करून चालवायला लागला..
रात्रि taxi चालवताना त्याचा गुनेगारी जगाताशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे सम्बन्ध येऊ लागला. बर्याचदा सराईत गुन्हेगार शिवाला दमदाटी करून त्याचे taxi चे भाड़े देत नसत. धनुला त्याचा फार राग येई पण बिचारा हतबल होता. कालानुक्रमे त्याला बर्याच गुन्हेगारांचे कारनामे, गुप्त गोष्टी,कामाचे स्वरुप त्यांच्या एकंदर बोलण्यावरुन समजायला लागले. आपल्या रागाला शिवाने वेगली वाट करून देण्याचे ठरवले.
इंस्पेक्टर सावंत.एक इमानदार पुलिस अधिकारी. पोलिस दलातील Encounter Specialist. लवकरच encounters ची century करण्याच्या मार्गावर. मुंबई crime branch मध्ये कार्यरत. मुंबई Under World मध्ये कमालीची दहशत. गृहमंत्र्यांच्या विश्वासातील. त्यांची सुट्टी मंत्रालयातुन मंजुर होत असे. अप्रत्यक्षपणे पुलिस खात्यातील एक independant resource.
शिवाने सावन्ताना भेटायचे ठरविले.
“साहेब, मधु राव आज मोठा game करणार आहे. तुमच्या खात्यातील DCP शर्मा त्याला फार त्रास देत आहे. टक्केवारी वाढवून मागत आहे. घरात घुसून त्याचा game करायचा plan आहे. काही केले तरी शेवटी डिपार्टमेंट चा माणुस. वाचवा त्याला. खबर पक्की आहे.”
“कोण बोलतोय ? “
“ते आताच सांगत नाही. काम फत्ते झाले की परस्पर येउन भेटतो..”
खबर खरी निघाली आणि सावंतने शर्माचा जीव वाचवला आणि राव चा Encounter.
दुसर्या दिवशी.
“साहेब, Congrats. तुमच्यावरच विश्वास होता म्हणून खबर तुम्हालाच दिली.” शिवा.
“ते ठीक आहे.. पण तु कोण ?”  इं.सावंत.
“हितचिन्तक”  शिवा.
“सरळ सरळ बोल..वेळ नाही आहे मला”  इं.सावंत.
“मी कोण ते भेटुनच सांगतो..तुमच्या नेहमीच्या बार वर भेटतो..आज रात्रि ९ वाजता.” शिवा.
“ठीक आहे”  इं.सावंत.
“साहेब, मी शिवा भोसले. मीच राव ची खबर दिली होती.” शिवा.
“तू दिली होतीस ?” इं.सावंत
“काय झाले साहेब. तुम्हाला काय अट्टल गुन्हेगार अपेक्षित होता काय.” शिवा.
“बरोबर ओळखलेस.” इं.सावंत
“काय साहेब,सुशिक्षित खबरी नाही का असू शकत ? हा एक चांगला profession होऊ शकतो.आणि सेवाही.” शिवा.
“हम्म…नविन दिसतोस ह्या field मध्ये. पहिलाच attempt काय ?” इं.सावंत
“होय साहेब.. First and yet successful attempt.” शिवा.
“खबरी चा प्रत्येक attempt successful च हवा.. खबरीला खरी खबर देऊन जितका धोका गुन्हेगारान्कडून असतो त्यापेक्ष्या जास्त धोका पोलिसांना खोटी खबर देवून असतो.पोलिस नावाच्या जातिवार कधीच विश्वास ठेवू नकोस” इं.सावंत
“ते मी जाणुन आहे साहेब.” शिवा.
“ठीक आहे. मला आनंद आहे तुझ्यासारखे सुशिक्षित तरुण इतका धोका पत्कारयाला तयार आहेत हे पाहून. पैश्याची काही कमी पडणार नाही तुला. तुझ्या खबरेनुसार तुझा मोबदला आमच्या secrete fund मधून तुझ्या अकाऊंट मध्ये जमा होत राहील. हे फ़क्त आपल्या दोघात राहील. काहीही गरज पडली तर मला बिनधास्त फ़ोन कर.” इं.सावंत.
“धन्यवाद साहेब.” शिवा.
“ये तू आता.”  इं.सावंत.
सावंतांच्या बोलण्याने शिवाला फार हुरूप आला. पोलिस खात्यात अजुनही इमानदार,कर्तव्यतत्पर माणस आहेत ह्याची त्याला सुखद प्रचिती आली.
आता शिवा अजुन जोमाने कामाला लागला. रात्री taxi चालवन्यापेक्षा taxi तील प्रवाश्यांवर त्याची चौकस नजर असायची. प्रत्येक प्रवाश्यात तो काही तरी शोधण्याचा प्रयत्न करीत असे. गुन्हेगार लोक आपापसात सांकेतिक भाषेत (code language) संवाद साधत म्हणून अश्या भाष्या अवगत करण्यासाठी आणि आतल्या खबरी काढण्यासाठी शिवा taxi चालवन्यावरच विसंबून न राहता टपोरी, गुन्हेगार लोकांमध्ये उठबस करू लागला. त्यात ओघानेच दारू, जुगार, बायका ह्याही गोष्टी आल्याच. सराईत गुन्हेगारांशी त्याची चांगलीच दोस्ती जमली. गुन्हेगारी जगताचे भयानक रूप त्याच्या समोर येत होते. मोठ्या गुन्हेगारांच्या पार्ट्या मध्ये जाण्याचा तो काहीही करून प्रयत्न करू लागला. त्यात तर पोलिस खात्याचे ही भयानक रूप त्याच्या समोर येऊ लागले. पोलिस शिपायाँपासून ते बरेच मोठे अधिकारी त्याला पार्टीत दिसू लागले. तेव्हा त्याचा फार मनस्ताप होत असे. वाटे की हे सगळे सोडून द्यावे पण सावंतांना दिलेला शब्द त्याला हे करू देत नसे..
शिवाच्या मेहनातिला फळ येऊ लागले. बरेच गुन्हेगारी कट त्याने दिलेल्या खबरीमुले उध्वस्त होऊ लागले. सावन्तांचा encounter चा आकड़ा आणि दरारा वाढू लागला. त्यांची राष्ट्रपदी पदकासाठीही निवड झाली. सावंतही शिवाच्या मेहनतिला आणि मदतीला जाणून होते..
त्यानी शिवाची थेट गृहमंत्र्याँशी भेट करून देण्याचे ठरवले..
गृहमंत्री जोशी म्हणजे अगदी clean personality. विरोधकही कधी त्यांच्यावर आरोप करायला धजत नसत. सैन्यात colonel पदावर कार्यरत असताना एका जेष्ठ राजकारणी महोदयांच्या विनंतीला मान देऊन राजकारणात प्रवेश केला. राजकारणातही त्यांच्या गुनांना हेरून त्याना गृहमंत्री पद देण्यात आले. त्याचा त्यांच्या बरोबरच्या मंत्र्याना फार हेवा वाटे. त्यांची काम करण्याची पद्धत ही सैन्याप्रमाने होती. ते मंत्रीपदी आल्यापासून त्यानी राज्यात फार धोरणात्मक सुधारणा केल्या. डांस बार, सट्टा,जुगार,मटका इत्यादी कायमचा बंद केला त्यामुले पोलिसांची वरकमाई बंद झाली. बीअर बार च्या वेळा तंतोतंत पाळल्या जाऊ लागल्या.
शहरे बंद सारखी आंदोलने, मिरवणुकातिल अभद्रपणा कमी झाला. पोलिसांच्या कामातील स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप कमी झाला.
Under World चा issue हा पोलिसी पद्धतीने न हाताळता army style ने हाताळला जाऊ लागला. पोलिस खात्यात तर अभूतपूर्व सुधारणा केल्यात. पोलिसाना physical fitness compulsory केली. पोलिसांचे पोट कमी झाले   पोलिस खात्यातील शस्त्रखरेदी कड़े गृहमंत्र्यानी जातीने लक्ष घालून अत्यंत आधुनिक हत्यारे पोलिस खात्यात खरेदी केली..
गृहमंत्र्यांची स्वतःची अशी विश्वासु पोलिस अधिकार्यांची informal टीम होती. पोलिस खात्यातील highest priority cases ही टीम संभाळत असे. ह्या टीम मधील अधिकार्याना विशेष अधिकार दिले होते. ही टीम गृहमंत्र्याना report करत असे. प्रत्येक अधिकारयाचे आपले एक नेटवर्क होते. ह्या टीम चे केंद्रातील national security शी संबंधीत खात्यांशी synchronization चालत असे.
गृहमंत्री निवास:
इ.सावंत : “साहेब, हा शिवा.  राव, ठाकुर, गवळी gang च्या खबरी ह्यानेच दिल्या होत्या. solid network आहे पठ्य्याचे.. १००% पक्की खबर असते. मी  शिवाबद्दल तुम्हाला आधी सांगितले होते.”
गृहमंत्री : “Yes. I know. I’m really impressed by Shiva.  शिवा आत्तापासून आपल्या team मधील एक. But Informally.
Sawant, Shivaa will work with  you. Provide him all the details about our  team and its functioning. Also provide him all the facilities we provide to all our team players..
Shiva, now you have to work hard. काहीही problem असेल तर  I’m always there for you.
शिवा : Thanx Sir. I will really work hard and won’t let you down..
गृहमंत्री : All the best..
गृहमंत्र्यांशी भेट म्हणजे एक पर्वणीच होती.. शिवाला अगदी Top of the world असल्यासारखे वाटत होते…
शिवा आता highest priority च्या केसेस वर कम करू लागला. त्यासाठी त्याला आपले नेटवर्क अजुन सक्षम बनवावे लागले.. जास्त धोके पत्करावे लागत होते. खबरीच्या कामातही promotion असते आणि ते अजुन जास्त धोकादायक असते ह्याचे त्याला प्रत्यंतर येत होते. पण  शिवाला त्याचे दुःख वाटत नव्हते, उलट तो ते काम जास्त enjoy करत होता … That is called work satisfaction.
शिवाच्या मेहनातिला यश येत होते. त्याच्या टिप्स मुले आणि टीम मधील विरांच्या पराक्रमामुले त्यांनी अनेक देशविघातक कट उधलुन लावले..
शिवाच्या  कामाची team मध्ये प्रशंसा होऊ लागली….
सावतांची ही २-३ promotions झाली..
गृहमंत्र्यांचा विश्वास शीवाने सार्थ ठरविला…सावंतांच्या,गृहमंत्र्यांच्या खाजगी लोकांमाधिल शिवा एक झाला. गृहमंत्र्यांची मर्जी त्याने संपादन केली.
एकंदरीत सर्व व्यवस्थित चालू असताना महाराष्ट्राच्या  इतिहासातील एक दुर्दैवी दिवस उगवला…
मुंबईतील  शिवसेना भवन, नागपुरातील संघ कार्यालय, गणेश टेकडी मंदिर, दादर मधील अक्षरधाम मंदिर, सिद्धिविनायक, पुण्यातील दगडूशेठ गणपति मंदिर ह्या हिन्दू प्रार्थना स्थलांवर आणि हिन्दू राजकीय पक्ष्यांच्या कार्यालयांवर आतंकवादी हमले झाले.. आतंकवादी त्या त्या स्थलांमध्ये लपून बसले..त्यानी काही भाविकाना बंदी बनवले…संपूर्ण महाराष्ट्र हादरला…..संपूर्ण महाराष्ट्रात red alert पुकारण्यात आला…नाकाबंदी करण्यात आली….
भाविकांच्या सुटकेसाठी आणि आतंकवाद्याना कंठस्नान घालण्यासाठी दिल्लीहून NSG comandos पाचारण करण्यात आले.
NSG commandos आणि गृहमंत्र्यांच्या special team ने हे कार्य पूर्णत्वास नेले. सर्व भाविकांचा जीव वाचवण्यात यश आले..सर्व आतंकवाद्याना मृत्युदारी पोहचवले. ह्या ऑपरेशन मध्ये बरेच जवान आणि पोलिस शहीद झाले…
गृहमंत्र्यांच्या राजिनाम्याची मागणी जोर धरु लागली…परन्तु गृहमंत्र्यांचे एकंदरीत record पाहून आणि त्यांच्या नंतर इतके महत्वाचे पद सांभाळन्याची कोणाही मंत्र्याची लायकी नाही हे पाहून केंद्राने ती मागणी फेटालुन लावली….गृहमंत्री पदाचे स्वप्न पाहणारया उपमुख्यमंत्री दिलीपराव शिंदे,बांधकाम मंत्री आनंददादा पवार,महसूल मंत्री रामदास नागरे ह्यांचा भ्रमनिरास झाला…
महाराष्ट्र सावरला…
अश्याच एका दिवशी इ. सावन्तांचा शिवाला फ़ोन आला..त्यांनी शिवाला ताबडतोब बोलावून घेतले…
इ.सावंत: ये शिवा..बस..
शिवा: काय झाले साहेब ?
इ.सावंत: तुला गृहमंत्री साहेबांबद्दल काय वाटते ?
शिवा: हा काय प्रश्न साहेब.. माझे तर ते आदर्श आहेत. त्यांच्यासारखा कणखर, इमानदार, कर्त्तव्यतत्पर नेता सापड़णे अशक्य आहे.  माणसांची त्याना परख आहे. राजकारण हा त्यांचा पिंडच नाही.. जे काही करणार ते राष्ट्रहितानुसारच करणार..
इ.सावंत: अगदी बरोबर. माझा पण कालपर्यंत  हाच समज होता  ..
शिवा: समज ?
इ.सावंत: हो समजच. इतक्या वर्ष्यांच्या पोलिस सेवेत गुन्हेगाराला एका नजरेत ओळखु शकणारा मी साहेबाना नाही ओळखु शकलो..
शिवा: साहेब, असे कोडयात बोलू नका…
इ.सावंत: महाराष्ट्रातील आतंकवादी हल्ल्यावर जी चौकशी समिती नेमली होती तिचा रिपोर्ट पुढच्या आठवड्यात येत आहे. त्यात I.S.I. वर ठपका ठेवण्यात आला आहे. I.B. मध्ये माझा मित्र खांडेकर आहे त्यानेच ही आतली बातमी दिली…
शिवा: I.S.I. चा हाथ आहे हे तर जगजाहीर  आहे..
इ.सावंत: I.S.I. फ़क्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी. Inquiry करत असताना त्यात केंद्रातील आणि राज्यातील काही वरिष्ठ मंत्र्यांनी I.S.I. ला मदत केली हे उघडकीस आले आहे.
शिवा: वरिष्ठ मंत्री म्हणजे ? Please be specific.
इ.सावंत: वरिष्ठ मंत्री म्हणजे केंद्रातील गृहमंत्री कृपाशंकर नायर आणि आपले गृहमंत्री साहेब श्री जोशी.
ह्या दोघंव्यतिरिक्त अजुन बरेच महाभाग मंत्री आहेत. परन्तु केंद्रातील गृह खाते हे कृपाशंकर नायर यांच्याकडे असल्याकारणाने त्यानी अहवालात बदल करून सर्व मन्त्र्यांवारील आरोप नाहीसे केले आहेत.
शिवा: माझा विश्वास नाही बसत.
इ.सावंत: माझा पण नव्हता, पण खांडेकरांनी जेव्हा मला साहेबांची कुंडली काढून दाखवली तेव्हा त्यावर विश्वास करण्यापलिकडे मी काहीच करू शकत नव्हतो. साहेब सैन्यात असताना सैन्यातील शस्त्रास्त्रे आतंकवाद्याना विकण्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि त्यात त्यांचे court martial होणार होते. पण साहेबांवर त्यावेळच्या संरक्षणमंत्र्यांचे कृपाछत्र होते आणि त्यानी वेळ निभावुन नेउन ही खबर बाहेर न येऊ देता साहेबांची त्या आरोपातुन सुखरूप मुक्तता केली..
शिवा: पण इतकी मोठी भानगड जनतेच्या समोर कशी नाही आली..
इ.सावंत: मोठी भानगड फ़क्त जनतेसाठी. ह्यांच्यासारख्या प्रस्थान्साठी हा फ़क्त एक उजेडात न आलेला गुन्हा आणि तो ही manage करण्यासारखा. सत्य जनतेला किती टक्के सांगायचे हे संपूर्णपणे ह्यांच्या हातात…जर सत्य १००% सांगितले तर तर ते सत्य न राहता कटुसत्य होते. म्हणून ही मंडळी जनतेला त्यांच्या अनुरूप सत्य सांगतात.  कोणता नेता जनतेला स्वतःची संपत्ति उघडपणे सांगतो, किवा कोणता नेता/खासदार सरकार कडून आपल्याला किती निधी मंजूर झाला ते स्वत:हून सांगतो.
पत्रकारिता तर ह्यांची हक्काची marketting agency झाली आहे… पैसे देऊन आपल्या बाजुच्या बातम्या छापून जनतेत आपले खोटे चित्र उभे करतात.
Sorry,I’m digressing.
पुढे त्या संरक्षणमंत्र्यांची केंद्राच्या गृहमंत्रीपदी वर्णी लागली आणि आपल्या मर्जितला माणुस म्हणून त्यांनी पक्षश्रेष्टिवर दबाव टाकुन साहेबांची महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदी वर्णी लावली..
शिवा : हे कितीही खरे जरी असेल तरी साहेब हे हिन्दू आहेत आणि झालेले हल्ले हे तर हिन्दू धार्मिक स्थलांवर होते…साहेब आपल्या धर्माशी अशी प्रतारणा नाही करू शकत.
इ.सावंत : अरे ज्यांनी देशाशी प्रतारणा केली त्यांच्यासाठी धर्मं काय चीज आहे. पैसा हाच खरा देव. सत्ता हाच खरा धर्मं. जर उदया एखाद्या निष्पाप लहान मुलांच्या अनाथ आश्रमावर  हल्ला करण्याची योजना जरी बनली तरी ह्यांचा त्याला विरोध नसेल..
ह्यांनी आमच्याकडून त्यांच्या सोइनुसार  encounters  करून घेतलीत..तुला आठवते आम्हाला शेट्टीची encounter  करायची order  नव्हती कारण शेट्टी च्या धंद्यात यांचीही partnership होती..
जवळच्या माणसाने पाठीत खंजीर खुपसावा आणि तो खेचून पुन्हा पुन्हा खुपसावा अशी शिवाची अवस्था झाली…
शिवा आता नेहमीचा शिवा राहिला नव्हता तर तो सत्तेच्या पटावरील एक प्यादा बनला होता ज्याला साहेबानी आपल्या कामासाठी वापरले.
शिवा: काय आपण इतके हतबल आहोत की इतके सगळे आपल्या समोर होत असुनही आपण मूक पाहत रहायचे.?
इ.सावंत : त्यासाठीच मी तुला बोलावले आहे…
मी साहेबाना, एक देशद्रोह्याला असे सोडणार नाही.
मी ह्या देश्द्रोह्याचा वध करायचे ठरविले आहे… हो, तो एक एनकाउन्टर, खून नसून एक वध असणार…
जीव गेला तरी पर्वा नाही पण आता खाकी वर्दितिल शंढ म्हणून रहायचे नाही…
एक वचन दे. माझ्यामागे माझ्या कुटुम्बाकड़े लक्ष्य देशील. तूच एक माझ्या विश्वासताला आहेस .
शिवा: साहेब एक विनंती आहे. हे काम माझ्यावर सोपवा. तुमच्यामागे ३ जीव आहेत. त्यांचे भविष्य तुमच्यावर अवलंबून आहे. एका देश्द्रोह्यासाठी त्यांचे भविष्य अंधकारमय करू नका. माझ्यामागे फ़क्त माझी आई आहे म्हणून तुम्हीच मला वचन द्या की तुम्ही माझ्या आईची काळजी घेणार..
इ.सावंत: हे शक्य नाही. आम्हा पोलिसांचे हे कर्त्तव्य आहे..ते आम्हालाच पार पाडू दे..
शिवा: आपण आपल्या घरी चोरी होत असताना फ़क्त पोलिसांची वाट पाहतो काय ? First Aid हे ज्याचे त्यालाच करायचे असते. इथे प्रत्येक नागरिक एक सैनिकच आहे.. आजचे हे माझे मागणे नाकारू नका….तुमची मुले तुमची वाट पाहत आहे आणि माझा देश माझी…
(फार विनवणी करून शिवाने सवान्तांची परवानगी घेतली)
दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे गृहमंत्री जोशी morning walk करत असताना शिवाने त्यांचा वध  केला…
गृहमंत्र्यांच्या अंगरक्षकान्नीही शिवाच्या शरीराची bullets ने चाळणी केली…
मरताना शिवाच्या चेहर्यावर एक अल्लौकिक तेज होते..अगदी war front वरील शाहिदासारखे…..
संपूर्ण महाराष्ट्र गृहमंत्र्यांच्या मृत्युने स्तब्ध झाला….
२ दिवसानंतर……
स्थळ: बांधकाम मंत्री आनंददादा पवार ह्यांचे निवासस्थान
उपस्थित: मुख्यमंत्री वसंतराव देशमुख,  उपमुख्यमंत्री दिलीपराव शिंदे, बांधकाम मंत्री आनंददादा पवार, महसूल मंत्री रामदास नागरे, उर्जा मंत्री मानिकराव गायतोंडे, इंस्पेक्टर सावंत.
रामदास नागरे: Three Cheers for our victory… पवार साहेब मानले पाहिजे तुम्हाला.. काय गेम खेळलात
आनंददादा पवार: अहो आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते…खरे आभार मानायचे तर मुख्यमंत्री साहेबांचे माना..त्यानी हिरवा कंदील दिला नसता तर हा गेम बनलाच नसता..
मुख्यमंत्री वसंतराव देशमुख: काय चेष्टा करतात राव….आम्हाला फ़क्त इतकेच कळते की इतकी माया जमवा की पुढच्या ७ पिढयाना No Tension…
उपमुख्यमंत्री दिलीपराव शिंदे: हो ना राव. नावाचा उपमुख्यमंत्री होतो मी. सगळे अधिकार त्या जोश्याकडे. ईमानदारीचा कळसच केला होता त्याने. स्वत पण खात नव्हता आणि आपल्याला पण खाऊ देत नव्हता….
आता माझ्याकडे गृहमंत्री पद आले की सर्वांची चांदी… खा किती खायचे ते …
इंस्पेक्टर सावंत: अहो आमच्या पोलिस खात्याची तर वर कमाईच बंद केली होती त्याने. अहो डांसबार बंद, सट्टा बंद, हफ्ते बंद….वैताग आला होता नुसता…आम्ही तर आम्ही, घरी बायका-पोर पण परेशान. सरकारी पगार काय असतो ते ह्या २ वर्श्यात कळले…
साहेब तेवढे आमच्या promotion चे बघा म्हणजे झाले..
उपमुख्यमंत्री दिलीपराव शिंदे: अहो म्हणजे काय….कमिश्नर झालेच म्हणून समजा तुम्ही ..अरे सावंत त्या शिवाला कसे  खेळवले ते सांग आमच्या मुख्यमंत्री साहेबाना…
इंस्पेक्टर सावंत :  त्याचे काय साहेब आपल्या देशात सुशिक्षित बेरोजगारांची बिलकुल कमी नाही.. पायलीला ५० मिळतील…असाच एकदा गवसला….पट्ठा मात्र कामाचा होता, तेज होता….Department च्या पैश्यातुन त्याचा पगार जायचा, टिप्स मात्र आपल्या कामाच्या द्यायचा….जोशी साहेबांचा परम भक्त…जोशीसाहेबाना खलनायक म्हणून पेश करताना त्याचा जाम brain wash करावा लागला.जोश्यांसाराख्या  देवमाणसाबद्दल काय काय खोटे बोलावे लागले.त्याला काय माहित खरे खलनायक आपणच आहे ते…
बिचारा जोशी देव माणूस होता  पण ह्या देशात लोक दगडाला देव मानायला तयार होतात पण माणसातला देव कोणी ओळखत नाही.
खरे सांगतो साहेब आजकालची पीढ़ी देशासाठी काहीही बलिदान करू शकते…
बिचार्या शिवाला मरेपर्यंत वाटत होते की जोश्याना मारून आपण देशासाठी शहीद होत आहोत.पण त्याला काय कल्पना त्याचा मृत्यु तर आपण विकत घेतला होता….
मरेपर्यंत त्याला कळल़े नाही की सत्तेच्या पटावरील तो फ़क्त एक प्यादा होता.
जोश्यांचा वध करण्यासाठी गेला आणि त्याचाच encounter झाला….
पोलिस खात्यातील एक अदभुत एनकाउन्टर ….. एका खबरीचा एनकाउन्टर…
स्त्री’वाद’–एक ‘वादा’तीत विडंबन
स्त्री‘वाद‘
नवरात्र उत्सवातील एक संध्याकाळ.
विष्णुंचा मोबाइल ट्रिंग ट्रिंग…ट्रिंग ट्रिंग
नारद : हेलो…हेलो
विष्णु : बोल नारद. (कदाचित नंबर save केलेला असेल).
नारद : मला तुम्हाला भेटायचे आहे. कधी येऊ??
विष्णु : अरे तुला कधीपासून परवानगीची गरज पडायला लागली?
नारद : ते नंतर सांगतो. आधी येऊ की नको ते सांगा.
विष्णु : हो रे बाबा. ये…
(नारद आलेत…)
विष्णु : बर. कस येण केलस? सर्व कुशल मंगल आहे ना.
नारद : हो. अगदीच. एकटेच आहात? लक्ष्मी वाहिनी कुठे गेल्यात?
विष्णु : अरे नवरात्र आहे ना. खरेदी करायला गेली आहे. भूतलावर…पुण्याच्या तूळशी बागेत….
नारद : बर..
विष्णु : बर??…परवानगी का मागत होतास मघाशी? हे अचानक असले सोपस्कार का पालायला लागलास?
नारद : तुम्ही लक्ष्मी वहीनीना काही सांगणार नसाल तर सांगतो..
विष्णु : नाही रे सांगणार…बिनधास्त बोल.
नारद : अहो असाच एकदा तुम्हाला शोधत तुमच्या घरी आलो. तुम्ही घरी नव्हता. लक्ष्मी वाहिनी होत्या. त्यानी आदरातिथ्य तर केले पण दम पण भरला की स्वामिना खाजगी आयुष्य पण आहे. असा अचानक टपकत जाऊ नकोस. आधी फ़ोन करत जा अणि मग स्वामीनी (माझी सम्मति घेऊन ) तुला सम्मति दिल्यावरच येत जा..
तेव्हापासून जो धसका घेतलाय ते आता urgent काम होते म्हणुन फ़ोन करून आलो..
विष्णु : (रागाने) अपमान. घोर अपमान. माझ्या परम भक्ताला मला भेटायला फ़ोन करून यावे लगते. (फार विचार करून अणि शांत होउन) पण त्याला माझा पण नाइलाज आहे…होम मिनिस्टर पुढे मी पण हतबल आहे.
नारद : पण प्रभु, तुम्ही विश्वाचे स्वामी अणि असे हतबल??
विष्णु : मी असेल रे जगाचा स्वामी पण आमची पण स्वामिनी आहे ना आमच्या वर. भुतलावारिल नवरे मंडळी आणि आम्ही समदुखी आहोत. ते जाऊ दे.. काय काम काढलेस?
नारद : आहे बाबानी (ब्रह्मदेवानी). आपल्याला ताबडतोब घेउन यायला सांगितले. काही तरी भानगढ़ आहे.. चला लवकर. ते वाट पाहत असतील आपली.. केव्हापासून मिस कॉल येत आहेत त्यांचे.
विष्णु : चल नारद चल. ब्रह्मद्न्या म्हटले की गेलेच पाहिजे.
दोघेही ब्रह्मदेवाच्या घरी जातात…
ब्रह्मदेव : नमस्कार…या प्रभु या…अहो कधीपासुन वाट पाहत होतो तुमची.
विष्णु : माफ़ करा प्रभु. (जसे भूतलावर दोन राजकारणी भेटले की एकमेकाना मान देण्यासाठी एकमेकाना साहेब साहेब म्हणुन संबोधतात तसे देवलोकात आपले त्रिदेव (ब्रह्म,विष्णु,महेश) एकमेकाना प्रभु प्रभु म्हणुन संबोधतात).
ब्रह्मदेव : तर विषयाला हात घालतो. आपल्याकडे भुतालावारून तेथील बायकांचे एक शिष्टमंडल आले आहे. भुतलावारिल बायकांच्या समस्या घेवून. माझे स्त्रियांच्या बाबतीत knowledge थोड़े कच्चे आहे म्हणुन म्हटले तुम्हाला अणि महेश प्रभुना बोलावून घ्यावे. महेश प्रभुना नंदी घेवून निघाला आहे कैलासावरून.
हे काय आलेच ते …
(महेश प्रभुना पाहून)
विष्णु : अलभ्य लाभ…अलभ्य लाभ. किती दिवसानी आपण तिघे एकत्र भेटत आहोत. आजकालच्या ह्या धकाधकीच्या कलियुगात महीनो महीने भेटच होत नाही.
महेश प्रभु : नमस्कार…नमस्कार. मला रस्त्यात नंदीने सांगितले की कोणी तरी बायकांचे शिष्टमंडल आले आहे म्हणुन भुतालावारून….
ब्रह्मदेव : छान…तर नारदा प्रभुना शिश्तमंडलातिल बायकांची ओळख करून दया. किंबहुना त्यानाच सांग इंट्रो द्यायला.
नारद: शिष्टमंडलात ५ सभासद आहेत. सौ. शहाने, सौ नेने, सौ डोइफोडे, सौ पोटदुखे, कुमारी जवळकर. ह्या सर्व क्रमाक्रमाने येउन इंट्रो देतील….
सौ.नेने : मी मधुरा नेने…वय वर्षे ३५, मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका आहे. आमचे हे बँकेत मेनेजर आहेत. बँकेचा हिशोभ संभालता, पण घराचा साधा हिशोब लावता येत नाही. आमची २ मूल. थोरला सहावी तर धाकटा चौथी मधे आहे. माझे सासरे म्हणजे देवमाणुस, सासु मात्र खट्याळ अणि ती ननंद तर.. (मधेच नारद सौ नेनेना हाथ जोडून बस करा म्हणुन सांगतात.. सौ नेने नारादावर खेकसून आवरते घेतात.)
सौ शहाने : मी तेजस्विनी शहाने. वकीलिचा व्यवसाय करते. बायकान्च्याच केसेस घेते. विशेषतः हुंडाबंदी, सासर्च्यान्कडून अत्याच्यार, वडिलांच्या प्रोपर्टी मधे मुलीला हक्क मिलवुन देने, नवर्याकडून घटस्फोट मिलवुन देणे, घटस्फोटानंतर पोटगी मिलवुन देणे, असल्या केसेस मधे माझा हातखंडा आहे. (रागाने)नवर्याबद्दल काही सांगण्यासारखे नाही.
सौ डोईफोडे : मी संजीविनी डोईफोडे. डॉक्टर आहे, आड़नावावर जाऊ नका, नेत्ररोगतद्न्य नसुन स्त्रीरोगतद्न्य आहे.. मुद्दाम ह्यात specialization केले. स्त्रीभ्रूण हत्तेला माझा तीव्र विरोध आहे. असल्या केसेससाठी पार्टी आली की मी त्याना पहिले पुलिस स्टेशनचा रास्ता दाखवते. नवरा दिल का डॉक्टर आहे(हार्ट स्पेसिअलिस्ट). मूलबाळ अजुन तरी नाही.
सौ पोटदुखे : मी जठरा पोटदुखे. पत्रकारितेचा कोर्स केला आहे पुणे पिद्यापीठतुन. आमच्या अपार्टमेन्ट मधील ‘घरोघरी’ ह्या महिला मंडलाची ३ वर्षांपासून निर्विवाद अध्यक्षा आणि मंडलाच्या ‘कानोकानी’ ह्या सप्ताहिकाची संपादिका. एखादी च्या नवर्याची, सासु-सुनेच्या भांडणाची, नवरा-बायकोच्या रुसवा-फुगव्याची, एखादीच्या पोरीच्या पलुन जाण्याची इत्यादी… बातमी..सॉरी खबर…जर कळली आणि दिवसभरात जर संपूर्ण अपार्टमेन्ट च्या कानोकोपर्यापर्यंत नाही पसरली तर आडनाव बदलून देइन. (रागाने) पण आमच्या ह्याना माझ्या ह्या skills चे काडीमात्र कौतुक नाही. सारखी माझी खिल्ली उडवत मला ‘गावभवानी’ म्हणत असतात.
बर दोन शब्द संपवून आपला निरोप घेते ..
जुई जवळकर : मी कु. जुई जवळकर. वय सांगणार नाही. लहानपनापासून बाबांचे मला मोठे डॉक्टर किवा इंजिनियर करण्याचे स्वप्न होते. पण मला मात्र अभ्यासात काहीएक इंटेरेस्ट नव्हता. म्हणुन दहावी मध्ये आम्ही लावलेले दिवे पाहून, बाबानी मला कला शाखेत प्रवेश घेवून दिला. तर तुम्ही म्हणाल अभ्यासात इंटेरेस्ट नव्हता तर कशात होता, तर सांगते. मला मिस वर्ल्ड व्ह्यायचे आहे (कदाचित मिस वर्ल्ड साठी सुन्दर असण्याची पात्रता दुय्यम असते.:)).
तर असो, त्या दृष्टीने माझे प्रयत्नही चालले आहेत. अणि एकदा की मिस वर्ल्ड झाले मग नंतर सिनेमात काम करावे लागणार म्हणुन आत्तापसुनच अभिनयाचा क्लास लावला आहे,त्या जोडीला डांस क्लास, मॉडलिंगचा क्लास, पेर्सोनालिटी डेवेलोप्मेंट चा क्लास, इंग्लिश स्पीकिंग चा क्लास, एरोबिक्स चा क्लास अणि फोअर अ चेंज म्हणुन योगा क्लास.
काय सांगू संपूर्ण दिवस वेगवेगळ्या क्लास्सेस मधेच जातो. चैलेन्ज देऊन सांगते की एक दिवस तुमच्या त्या उर्वशी,मेनका,रम्भा माझ्याकडे पाणी भरायला असतील..
सगळी मंडळी चाट…..
नारद : हुस्श…संपल एकदाचे ह्या बायकांचे….कित्ती बोलतात ह्या…….
ब्रह्मदेव : हा, तर आपले येण्याचे काय प्रयोजन? की आलेत हवा पाणी बदलायला.तसे असेल तर आपण आमचे अतिथि आहात.आणि अतिथि देवो भवः…
सौ शहाने : आम्हाला हवा पाणी बदलण्यासाठी इतक्या दूर यायला वेळ नाही. त्यासाठी आमच्या इकडे बरीच ठिकाण आहेत. आम्ही इकडे आमच्या काही मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आलो आहोत…..
ब्रह्मदेव : मागण्या? त्यासाठी तुम्ही आपल्या सरकारकडे जा, संप करा, उपोषण करा ते समर्थ आहेत.
सौ शहाने : नाही. आमच्या मागण्या आपण सृष्टी निर्माण करताना केलेल्या ह्या fundamental design flaws बद्दल आहेत.
तुम्ही सृष्टि निर्माण करताना जो भेदभाव केला तो तुम्हास निदर्शनास आणुन द्यायचा आहे आणि तो भेदभाव दुर करण्यासाठी काही मागन्यारूपी सूचना करायच्या आहेत.
ब्रह्मदेव : बर..काय आहेत तुमच्या मागण्या?
सौ शहाने : आमच्या काही मागण्या पुढीलप्रमाणे…..
१: आमचे असे ठाम मत आहे की, तुम्ही स्त्रीची निर्मिती करताना मुद्दाम तिला पुरुषयांपेक्ष्या शाररिक दृष्टीने दुर्बल म्हणजे अबला बनविले आहे. आम्ही तुमच्या ह्या कृतीचा अखिल स्त्री वर्गाकडून जाहिर निषेध करतो. आणि स्त्रीयानाही पुरुश्यनित्केच शारीरिक सामर्थ्य देण्याची मागणी करतो..
२: अपत्य जन्माला घालण्याची जबाबदारी फ़क्त स्त्रीची असू नए. त्याच प्रकारची शाररिक रचना पुरुश्यान्मधेही निर्माण करावी. अणि ९ महीने पोटात मुलाचे संगोपन कोण करणार हा निर्णय सर्वस्वी नवरा-बायको वर सोपवावा..
३: वन्शावळ ही फ़क्त पुरुश्यांच्या नावाने न रहता त्याला समांतर अशी स्त्री वन्श्यावळ असन्याचाही नियम करावा.
४: लग्नाविधि आणि इतर पूजाविधी मध्ये पुरुषाला मुद्दामहून जास्त महत्व देण्यात आले आहे अणि स्त्रीला फ़क्त
सहचरणी म्हणुन दुय्यम स्थान देण्यात आले आहे. म्हणुन आमची मागणी आहे की सर्व वेद, उपनिशदे आणि इतर ग्रंथात सखोल संशोधन करून स्त्रीचे स्थानही पुरुशानित्केच महत्वपूर्ण करावे.
५: सातोजन्मी हाच पति लाभों म्हणुन वटसवित्रिचा जो उपवास आहे तो पूर्णत: ऐचिक असावा. कुण्या स्त्रीला जर चुकून आपला नवरा आवडलाच तर पुढल्या किती वर्श्यांसाठी ते ध्यान वागवायचे हे इच्चिन्याचे तिला संपूर्ण स्वातंत्र्य असावे. साताजन्मांचा पाढा वाचू नए..
६: तसेच जर एखादीला आपला नवरा आवडला नाही तर घटस्फोट देन्याबरोबराच पुढील कुठल्याही जन्मात हे ध्यान नशिबी पडणार नाही याची शास्वती मिलन्यासाठीही काही तरी उपाय सुचवावा.
७: तुम्ही त्रिदेव पुरुष असल्याने स्त्रीयांबद्दल निर्णय घेताना तुम्ही पक्षपात करण्याची दाट शक्यता आहे, म्हणुन स्त्रीयांबाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास आदिशाक्तिशी सल्लामसलत करावा. मगच निर्णय घ्यावा.
८ : आमच्या असेही निदर्शनास आले की भुतालाप्रमानेच स्वर्गलोकिही सर्व महत्वाची पदे ही पुरुष जातीकडे आहेत. कृपया याची नोंद घेवून योग्य ती कार्यवाही करावी.
९: आपण आमच्या ह्या मागण्या हलक्याफुलक्या धमक्या समजू नए म्हणुन आमच्या शक्तीचे द्योतक म्हणुन भुतालावारिल सरकारकडून आम्ही हिसकावून घेतलेले काही आरक्षणवजा स्वातंत्र्य नमूद करत आहोत …
जसे, शैक्षणिक क्षेत्रात,सरकारी नोकरीत,संसदेत अणि इतर सरकारी उप्क्रमान्मध्ये ३०% आरक्षण.
विमान सेवा(एयर होस्टेस),अरोग्यसेवा(नर्सेस वगैरे) यात कमीत कमी ९०% आरक्षण.
सरकारी बसेस मध्ये ५०% आरक्षण.
बैंकतुन कर्ज घेताना आरक्षण.
नवरयाचा महिन्याचा पगार पहिल्या दिवशीच घेवून ती आपल्याच कष्टाची कमाई आहे असे समजुन मनसोक्त खर्च करण्याचे स्वातंत्र्य.
स्वतः काही एक नसताना डॉक्टर नवर्याच्या पुण्याईणे डॉक्टरिन बाई, किवा मास्तर नवर्याच्या पुण्याईणे मास्तारिन बाई असे बिरुद मिरवन्याचे स्वातंत्र्य.
स्वत: नौकरी करत नसताना matrimony site वर नौकरी करणाराच नवरा पाहिजे अशी अपेक्षा म्हणुन लिहिण्याचे स्वातंत्र्य.
नौकरीत कितीही चूका केल्यात तरी टीम मेनेजर कडून appreciate mail मिलविन्याचे स्वातंत्र्य .
आपले काम कधीही वेळेवर पूर्ण न करता मेनेजरला आपल्या घरच्या कामाच्या व्यापाचे कारण देऊन त्याला सेंटी(मेंटल) करण्याचे स्वातंत्र्य.
तेच उरलेले काम मग male collegue ला गोड स्माइल देवून त्याच्या माथी मारण्याचे स्वातंत्र्य.
रात्रि सुरक्षिततेचे कारण देवून ऑफिस मधून ६ वाजताच कलटी मारण्याचे स्वातंत्र्य .
..आणि इतर नमूद न करण्यासारखे बरेच काही….
(वरील पराक्रम ऐकून ब्रह्म,विष्णु,महेश,नारद चाट पडतात आणि स्त्री शक्तिला घाबरून निर्णय लाम्बवन्याचे काम विष्णुन्वर सोपवतात )
विष्णु : आपल्या काही मागण्या योग्य असून बरयाच मागण्या विचार करूनच निर्णय घेन्यासारख्या आहेत. सध्या सणवारचा महिना असल्यामुले आम्ही बरेच बिझी आहोत..आम्ही ह्या मागण्यानवर गहन विचार करून आमचा निर्णय दिवाली नंतर कळवू…या तुम्ही….
सौ शहाने : ठीक आहे …तुमच्याकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. बरीच कामे पडलीत घरी. आमच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्व सभासदानकडुन धन्यवाद. येतो आम्ही…
(त्यांचे हे संभाषण दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती दुरून कोणाच्या नकळत ऐकत असतात. परत जाणारया बायकाना गाठून. आणि काही तरी गहन सांगायचे म्हणुन त्याना आपल्या कक्षात घेवून जातात)
दुर्गा : आम्ही तिघिनी आपल्या मागण्या ऐकल्या. ज्या मागन्यांचा आम्ही विचार देखील केला नव्हता. त्या तुमच्या मागण्या ऐकून खरेच तुमचे कौतुक करावेसे वाटते. आणि तुमचा भुतालावारील पराक्रम तर वाखान्न्याजोगा आहे…
हे सर्व ऐकून आमच्यातली स्त्री जागी झाली आहे. आता ती माता,मुलगी,बहिन,पत्नी,सुन इ. सगळी नाते टाकुन देवून स्त्री म्हणुन जगणार आहे. त्यासाठी आमचा एक master plan आहे….
ह्या नवरात्र उत्सवातील सर्व सत्व पणाला लावून आम्ही स्वर्गलोकातील सर्व माता मंडळी आदी शक्तीच्या नेतृत्वाखाली स्वर्गलोकातील सर्व प्रस्थापितान्विरुध युध्य पुकारून दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर स्वर्गलोकावरील सत्ता काबीज करू…
आणि मग काय तुमच्या मागण्या आपण चुटकीसरशी पूर्ण करू….
मग भूतलावर अणि स्वर्गलोकावर फ़क्त स्त्रीजातीचेच राज्य…..आपले ‘कालियुग‘
द्या टाळी…
(सर्व एकसाथ) गर्व आहे आम्हाला स्त्री म्हणुन जन्माला आल्याचा…जय हो….
आजोळ
आजोळ….
उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्हाला  गावी जाण्याचे वेध लागे. लग्नसराई असायची म्हणुन सर्व नातेवैकांच्या भेटीगाठी होतील हा विचार आई बाबांच्या गावी जाण्याच्या निर्णयामागे असायचा. आमचे आजोळ विदर्भातील एक खेडेगाव अणि वडील नौकरी निमिताने नाशिक जिल्ह्यातील मनमाड(रेलवे जंक्शन) येथे स्थाईक म्हणुन शक्योतो विशेष कारण असेल तरच जावे कारण फार लांबचा पल्ला होता आणि त्याला जोडून अर्थकारणही होतेच.
असो, थोड़े अवांतर, आई बाबांचे लग्न आत्या घरी भाची असे जमुन आले. वडिलांची आई वडील चौथित असतानाच  आजाराने वारली. मग वडिलांचा साम्भाळ आईच्या बाबांनी म्हणजे आजोबानी करण्याचे ठरवले. आईचे काका हे मुख्याध्यापक होते. त्यानी वडिलांच्या शिक्षणाचा वसा उचलला. एकंदरीत, आमचे आजोळ म्हणजे आईकडचे.
आईचे माहेर म्हणजे एकत्र कुटुंब, आजोबाना 3 भाऊ , १ बहीण (वडिलांची आई). आईचे बाबा सगळ्यात थोरले, गावाचे पाटिल, गावातली पहिली विहीर त्यानीच बांधलेली, बैल पोळ्य़ाच्या सणामध्ये पहिला मान आजोबांच्या बैलजोडीला.
मला  ४ मावश्या अणि एक मामा, मामा थोरला, मामा फॉरेस्ट ऑफिसर, कोणाची मजाल की कोणी त्याच्याशी वाद घालेल तर, लोक त्याला जंगलाचा सिंह म्हणतात. आईच्या घराचा आणि आईच्या काकांच्या घराचा गोतवाला धरला तर  घरच्या लग्नासमारम्भाला बाहेरच्या लोकांची गरज नको इतका मोठा.
आईचे माहेर एक खेडे होते. त्यात बस जात नव्हती, जवळच्या बस पोहाचनार्य  गावाहून ५-६ किमी पायपीट करून जावे  लागे पण आम्हाला त्याचा त्रास होत नसे कारण गावी जाण्याचा आनंद काही औरच  होता. गावातल्या मजेची सर कश्यालाही  येणार नाही.
आमचे फार मोठे शेत होते. फार मोठी अमराई होती. रोज शेतात जाने, तिथल्या गडयाना वेगवेगले प्रश्न विचारावे, मग त्यांचे काम आपण करून पाहावे (नांगर चालविने, गाईचे दूध काढ़ने, बैलगाडी चालविने, बैलाना पाण्यासाठी घेवून जाणे अणि इतर ). फार मजा यायची ती कामे करताना, गुंग होऊं जात असू.
तो काळ काही औरच होता.
मला अजुनही आठवते, जर गावातल्या मुलाचे लग्न असेल तर, वर्हाडी मंडळी बैलगाडी वर जात, प्रत्येक घर आपली बैलगाडी घेवून जात असे, बैलगाडयाचा ताफा निघत असे. सगले लोक आपल्या घरचे लग्नच  समजत असत.
गावातल्या मुलीचे  लग्न असेल तर गावातल्या प्रत्येकाला वाटे की आपल्याच घरचे  लग्न आहे. प्रत्येकजण झटुन काम करी.
गावातली लग्न पण विचारायला नको. लग्नाचा दिवस नसून लग्नाचा पंधरवाढाच असे.
घरचे लग्न असेल तर माझ्या मावश्या त्यांची मूल १५-20 दिवसापासून येत, आम्ही दुरून आलो हे पण त्याला एक कारण होते. मग काय मामा,माव्श्यांची पोर,एकाच धमाल असायची.अन्ताक्षरी,क्रिकेट, असे बरेच उद्योग चालायचे.
रात्रि आईचे काका आम्हाला टिपिकल गावाच्या स्टाइल मध्ये गोष्टी रंगवून सांगत, त्यातले काही शब्द कळत नसत.फार मजा यायची. गावातल्या त्या रात्री अविस्मरणीय असायच्या. अजुन एक वेगले व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या आईची आजी म्हणजे माझी पणजी, शम्भरी गाठली होती त्यानी. इतके जगुनही तरुनाना लाजवेल असा त्यांचा उत्साह होता. त्या संध्याकाली भावगीत गात. असाच एक प्रसंग सांगावयास वाटतो.
एकदा अशीच मैफिल बसली असताना, माझ्या पणजीने  माझ्या मामेभावाला गा म्हणुन सांगितले. त्याला तर काही अश्या गाण्याचा गंध नव्हता . वेळ काढून नेण्यासाठी त्याने ‘ओये ओये’  हे  त्रिदेव सिनेमातले (त्या काल़ी हे गाणे म्हणजे एकदम super hit) गाणे गायला सुरवात केली. पणजी म्हणाली हे कुठले रे गाणे मी  तर कधीच नाही ऐकले. तर त्याने संदर्भासहीत स्पष्टीकरण दिले की एका मोठ्या संताने तीनही देवाना (त्रिदेव)  समर्पुन हे गाण गायले आहे. आम्ही हसत होतो अणि पणजी बिचारी गाणे ऐकत होती.
एकुणच सांगायचे तर असे ते सोनेरी दिवस होते. आईचे काका,काकू,आजी,आई,बाबा कोणीही आता नाहीत. म्हणुन आईला पण आता तिकडे जावेसे वाटत  नाही. सगल्या मावश्या,मामा यांची परिस्थिति आइपेक्ष्या  वेगळी नाही. आम्ही सगळी नातवंड आपापल्या करियर मध्ये व्यस्त आहोत ..काहींचे लग्नही उरकले. आता भेट फक्त काही कार्यक्रम असेल तरच होते. पाहिले लग्नाच्या कितीतरी दिवस अगोदर जायचो आता या धकाधकीच्या दिवसात तर  हळदिच्या दिवशीचे प्लानिंग केले तरी खुप झाले. एक एक दिवसाच्या  सुट्टीसाठी टीम मेनेजर ला कन्विंस  करावे लागते…काळानुरूप नाती  वीरळ  होत जातात हेच मी प्रत्यक्ष अनुभवत आहे..
आता फक्त ते दिवस आठवुणच त्यात रममाण व्हावेसे वाटते. ते आता अनुभवता येत नहीं याचे दुख ही होते.
अजुन एक शल्य म्हणजे आपण जो आनंद अनुभवाला त्यात रममाण तरी होऊ शकतो पण आजकालच्या चिमुकल्याना तर ह्या धकाधकीच्या आयुष्याने ते सुख,ते आजोळच पारखे झाले आहे.