आजोळ

आजोळ….
उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्हाला गावी जाण्याचे वेध लागे. लग्नसराई असायची म्हणुन सर्व नातेवैकांच्या भेटीगाठी होतील हा विचार आई बाबांच्या गावी जाण्याच्या निर्णयामागे असायचा. आमचे आजोळ विदर्भातील एक खेडेगाव अणि वडील नौकरी निमिताने नाशिक जिल्ह्यातील मनमाड(रेलवे जंक्शन) येथे स्थाईक म्हणुन शक्योतो विशेष कारण असेल तरच जावे कारण फार लांबचा पल्ला होता आणि त्याला जोडून अर्थकारणही होतेच.
असो, थोड़े अवांतर, आई बाबांचे लग्न आत्या घरी भाची असे जमुन आले. वडिलांची आई वडील चौथित असतानाच आजाराने वारली. मग वडिलांचा साम्भाळ आईच्या बाबांनी म्हणजे आजोबानी करण्याचे ठरवले. आईचे काका हे मुख्याध्यापक होते. त्यानी वडिलांच्या शिक्षणाचा वसा उचलला. एकंदरीत, आमचे आजोळ म्हणजे आईकडचे.
आईचे माहेर म्हणजे एकत्र कुटुंब, आजोबाना 3 भाऊ , १ बहीण (वडिलांची आई). आईचे बाबा सगळ्यात थोरले, गावाचे पाटिल, गावातली पहिली विहीर त्यानीच बांधलेली, बैल पोळ्य़ाच्या सणामध्ये पहिला मान आजोबांच्या बैलजोडीला.
मला ४ मावश्या अणि एक मामा, मामा थोरला, मामा फॉरेस्ट ऑफिसर, कोणाची मजाल की कोणी त्याच्याशी वाद घालेल तर, लोक त्याला जंगलाचा सिंह म्हणतात. आईच्या घराचा आणि आईच्या काकांच्या घराचा गोतवाला धरला तर घरच्या लग्नासमारम्भाला बाहेरच्या लोकांची गरज नको इतका मोठा.
आईचे माहेर एक खेडे होते. त्यात बस जात नव्हती, जवळच्या बस पोहाचनार्य गावाहून ५-६ किमी पायपीट करून जावे लागे पण आम्हाला त्याचा त्रास होत नसे कारण गावी जाण्याचा आनंद काही औरच होता. गावातल्या मजेची सर कश्यालाही येणार नाही.
आमचे फार मोठे शेत होते. फार मोठी अमराई होती. रोज शेतात जाने, तिथल्या गडयाना वेगवेगले प्रश्न विचारावे, मग त्यांचे काम आपण करून पाहावे (नांगर चालविने, गाईचे दूध काढ़ने, बैलगाडी चालविने, बैलाना पाण्यासाठी घेवून जाणे अणि इतर ). फार मजा यायची ती कामे करताना, गुंग होऊं जात असू.
तो काळ काही औरच होता.
मला अजुनही आठवते, जर गावातल्या मुलाचे लग्न असेल तर, वर्हाडी मंडळी बैलगाडी वर जात, प्रत्येक घर आपली बैलगाडी घेवून जात असे, बैलगाडयाचा ताफा निघत असे. सगले लोक आपल्या घरचे लग्नच समजत असत.
गावातल्या मुलीचे लग्न असेल तर गावातल्या प्रत्येकाला वाटे की आपल्याच घरचे  लग्न आहे. प्रत्येकजण झटुन काम करी.
गावातली लग्न पण विचारायला नको. लग्नाचा दिवस नसून लग्नाचा पंधरवाढाच असे.
घरचे लग्न असेल तर माझ्या मावश्या त्यांची मूल १५-20 दिवसापासून येत, आम्ही दुरून आलो हे पण त्याला एक कारण होते. मग काय मामा,माव्श्यांची पोर,एकाच धमाल असायची.अन्ताक्षरी,क्रिकेट, असे बरेच उद्योग चालायचे.
रात्रि आईचे काका आम्हाला टिपिकल गावाच्या स्टाइल मध्ये गोष्टी रंगवून सांगत, त्यातले काही शब्द कळत नसत.फार मजा यायची. गावातल्या त्या रात्री अविस्मरणीय असायच्या. अजुन एक वेगले व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या आईची आजी म्हणजे माझी पणजी, शम्भरी गाठली होती त्यानी. इतके जगुनही तरुनाना लाजवेल असा त्यांचा उत्साह होता. त्या संध्याकाली भावगीत गात. असाच एक प्रसंग सांगावयास वाटतो.
एकदा अशीच मैफिल बसली असताना, माझ्या पणजीने माझ्या मामेभावाला गा म्हणुन सांगितले. त्याला तर काही अश्या गाण्याचा गंध नव्हता . वेळ काढून नेण्यासाठी त्याने ‘ओये ओये’ हे त्रिदेव सिनेमातले (त्या काल़ी हे गाणे म्हणजे एकदम super hit) गाणे गायला सुरवात केली. पणजी म्हणाली हे कुठले रे गाणे मी तर कधीच नाही ऐकले. तर त्याने संदर्भासहीत स्पष्टीकरण दिले की एका मोठ्या संताने तीनही देवाना (त्रिदेव) समर्पुन हे गाण गायले आहे. आम्ही हसत होतो अणि पणजी बिचारी गाणे ऐकत होती.
एकुणच सांगायचे तर असे ते सोनेरी दिवस होते. आईचे काका,काकू,आजी,आई,बाबा कोणीही आता नाहीत. म्हणुन आईला पण आता तिकडे जावेसे वाटत नाही. सगल्या मावश्या,मामा यांची परिस्थिति आइपेक्ष्या वेगळी नाही. आम्ही सगळी नातवंड आपापल्या करियर मध्ये व्यस्त आहोत ..काहींचे लग्नही उरकले. आता भेट फक्त काही कार्यक्रम असेल तरच होते. पाहिले लग्नाच्या कितीतरी दिवस अगोदर जायचो आता या धकाधकीच्या दिवसात तर हळदिच्या दिवशीचे प्लानिंग केले तरी खुप झाले. एक एक दिवसाच्या सुट्टीसाठी टीम मेनेजर ला कन्विंस करावे लागते…काळानुरूप नाती वीरळ होत जातात हेच मी प्रत्यक्ष अनुभवत आहे..

आता फक्त ते दिवस आठवुणच त्यात रममाण व्हावेसे वाटते. ते आता अनुभवता येत नहीं याचे दुख ही होते.

अजुन एक शल्य म्हणजे आपण जो आनंद अनुभवाला त्यात रममाण तरी होऊ शकतो पण आजकालच्या चिमुकल्याना तर ह्या धकाधकीच्या आयुष्याने ते सुख,ते आजोळच पारखे झाले आहे.

Advertisements
प्रवर्ग: नाती
 1. Sandip Karale
  सप्टेंबर 14, 2009 येथे 6:58 सकाळी

  mast re… ajun lihi…..

 2. shital
  सप्टेंबर 14, 2009 येथे 7:06 सकाळी

  Mast ahe… Ajolchya athawani jagya zalya.

 3. $@`^)@Y
  सप्टेंबर 14, 2009 येथे 7:09 सकाळी

  Apratim…..Mazhya swathachya kahi aatvani tajya zalya…..

 4. Jitu Gharate
  सप्टेंबर 14, 2009 येथे 7:31 सकाळी

  tujhe he article vachun majhya hi athvanina ujala milala pan athvanit ramm-man vhayala pan vel nasto yache shalya tar vatatech aso……

 5. sahajach
  सप्टेंबर 14, 2009 येथे 10:18 सकाळी

  तर तू पण मनमाडचा…..मी ईंडियन हायस्कूलला होते….पण छत्रे हायस्कूलशी कायम संबंध होता….चिंचोळ्कर सरांकडे अभ्यासाला जायचे…..माझी आईदेखिल काही दिवस तिथे शिक्षिका होती….
  छान लिहितोस…..लिहितांना शुद्धलेखनावर अजून भर दे….

  • atulsdeshmukh
   सप्टेंबर 14, 2009 येथे 11:08 सकाळी

   इंडियन हाईस्कूल ला मी ११-१२ ला होतो,जूनियर कॉलेजल.पण छत्रेतील दिवस सोनेरी होते.छत्रेतुन मी १९९८ साली दहावी उत्तीर्ण केली.पुढे नासिक ला अणि त्यानंतर पुण्याला पुढील शिक्षण घेतले अणि आता दिल्लीला कामानिमित्ताने. आपल्या शुद्धलेखनाच्या सूचनेवर विशेष भर देइन.मराठीतून computer वर type करायला फार जिवावर येते कारणकी मी linux O.S वर कम करतो आणि मराठी font क्वचितच वापरतो.
   पुढच्या ब्लॉग बद्दल आपल्याला जरूर कलवेल..

 6. Sandeep
  सप्टेंबर 15, 2009 येथे 4:08 pm

  Wah atul far chan…mast lihitos…

 7. atulsdeshmukh
  सप्टेंबर 15, 2009 येथे 4:16 pm

  SandeepK,Shital,Sanjay,Jitu,SandeepB aapn apala amulya vel mazya blog la dilyabaddal dhanyavaad…assach lobh asava…

 8. ajit_bhojane
  सप्टेंबर 17, 2009 येथे 7:29 सकाळी

  what a gr8 blog yaar.Vachtanna majya mummychya gharche dolyasamor yet hote..Khop similarity ahe tyat…Thanks for writing this wonderfull blog and sharing with us…Its true now we can only feel the days but can’t enjoy it..

 9. Vikas Shelar
  सप्टेंबर 19, 2009 येथे 9:32 सकाळी

  Apratim… Aayala mala mahiti navhate tula itake bhari marathi yete te… Khup sunder… vachatana saglya goshti pratyakshyat utarlya, aani mala hi aajolachi uub janavali…. Ughadya dolyani swapna baghane je mhanatat na tasech…. keep it up dude… pudhacha dhada pradarshit kelyavar nakki kalav…

 10. poonam
  सप्टेंबर 26, 2009 येथे 1:54 pm

  Wow Wow Wow!!!!!!!!!!!!!!! Superb ….! I don’t have any word for u yar!!!! It’s simply simply simply simply simply simply simply simply simply simply simply awesome and very very true……!!!! Sagale mazejune diwas aathavale … !!!! Kase suchale re tula…. Vachata vachata manus emotional hoto … u r great my friend!!!!! Mala khup aavadale…. Keep it up yar …!!!!!

 11. Deepti
  सप्टेंबर 26, 2009 येथे 4:38 pm

  Atul kharach khup chan lihitos re……….mahit navhat re tu itk chan lihitos te……..good keep it up………navin kadhi kahi post keles tar nakki aathavanine sangat ja…………..

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: