मुखपृष्ठ > कथा > चक्रव्युह

चक्रव्युह

चक्रव्युह

“साहेब, शेट्टी आज रात्री मुंबईत येत आहे, दुबई वरून. रात्रि साकी बार मध्ये गाठा त्याला…पक्की खबर आहे.” शिवा.

“शेट्टीला हात लावायची order नाही. दूसरी काही खबर असेल तर बोल.” इंस्पेक्टर सावंत.

“साहेब पण शेट्टी वरील केसेस जाम भयंकर आहेत. आणि आता निसटला तर पुन्हा नाही सापडायाचा.” शिवा.

“It is none of your business. दूसरी काही खबर ? ” इंस्पेक्टर सावंत.

“सांगतो साहेब. आज रात्री भाऊ गावकर येणार आहे.रमनलाल शेठ जाम नाटक करतोय.त्याचा game करायला. आज त्याच्या पंटर लोकांनी fielding लावली आहे. आईला भेटायला पहिले घरी जाणार आहे.मग पक्या च्या घरी पंटर लोकाना भेटून, सेठचा game करून लगेच गोवा return.म्हातारीला भेटायला जाणार तेव्हाच गाठा त्याला.” शिवा.

“खबर पक्की आहे ना ?” इंस्पेक्टर सावंत.

“बस का साहेब.” शिवा.

“ठीक आहे.चल ठेव आता” इंस्पेक्टर सावंत.

शिवा भोसले….भोसले परिवारातील शेंडफळ….वडिल रेल्वेत वर्ग-३ कर्मचारी. मुंबई हे नौकरीचे ठिकाण. Railway quarters मध्ये वास्तव्य.
श्री भोसल्याना ४ अपत्ये. ३ थोरल्या मुली आणि आपला शिवा धाकटा. भोसल्याना शिवाला फार शिकवायचे होते. शिवाही हुशार होता. भोसल्यानी आपल्या तिघी मुलीना professional courses ला न टाकता BSC / BCOM करायला लावून त्यांची लग्ने उरकली. भोसल्याना T.B. चा त्रास होता. त्यातच एकदा दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यु झाला. औषधांवर सगळी savings खर्च झाली. म्हणून शिवानेही इंजीनियरिंग न करता BSC करून आपले शिक्षण थांबवले. आई चार घरची धुनी भांडी करत घर चालवत होती. शिवानेही नौकरीसाठी बऱ्याच खेटया घातल्या. शेवटी नौकरी आपल्या नशिबात नाही असे गृहीत धरून कोणा एका भैय्याची taxi रात्रपाळी करून चालवायला लागला..
रात्रि taxi चालवताना त्याचा गुनेगारी जगाताशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे सम्बन्ध येऊ लागला. बर्याचदा सराईत गुन्हेगार शिवाला दमदाटी करून त्याचे taxi चे भाड़े देत नसत. धनुला त्याचा फार राग येई पण बिचारा हतबल होता. कालानुक्रमे त्याला बर्याच गुन्हेगारांचे कारनामे, गुप्त गोष्टी,कामाचे स्वरुप त्यांच्या एकंदर बोलण्यावरुन समजायला लागले. आपल्या रागाला शिवाने वेगली वाट करून देण्याचे ठरवले.

इंस्पेक्टर सावंत.एक इमानदार पुलिस अधिकारी. पोलिस दलातील Encounter Specialist. लवकरच encounters ची century करण्याच्या मार्गावर. मुंबई crime branch मध्ये कार्यरत. मुंबई Under World मध्ये कमालीची दहशत. गृहमंत्र्यांच्या विश्वासातील. त्यांची सुट्टी मंत्रालयातुन मंजुर होत असे. अप्रत्यक्षपणे पुलिस खात्यातील एक independant resource.

शिवाने सावन्ताना भेटायचे ठरविले.

“साहेब, मधु राव आज मोठा game करणार आहे. तुमच्या खात्यातील DCP शर्मा त्याला फार त्रास देत आहे. टक्केवारी वाढवून मागत आहे. घरात घुसून त्याचा game करायचा plan आहे. काही केले तरी शेवटी डिपार्टमेंट चा माणुस. वाचवा त्याला. खबर पक्की आहे.”
“कोण बोलतोय ? ”
“ते आताच सांगत नाही. काम फत्ते झाले की परस्पर येउन भेटतो..”

खबर खरी निघाली आणि सावंतने शर्माचा जीव वाचवला आणि राव चा Encounter.

दुसर्या दिवशी.
“साहेब, Congrats. तुमच्यावरच विश्वास होता म्हणून खबर तुम्हालाच दिली.” शिवा.

“ते ठीक आहे.. पण तु कोण ?” इं.सावंत.

“हितचिन्तक” शिवा.

“सरळ सरळ बोल..वेळ नाही आहे मला” इं.सावंत.

“मी कोण ते भेटुनच सांगतो..तुमच्या नेहमीच्या बार वर भेटतो..आज रात्रि ९ वाजता.” शिवा.

“ठीक आहे” इं.सावंत.

“साहेब, मी शिवा भोसले. मीच राव ची खबर दिली होती.” शिवा.

“तू दिली होतीस ?” इं.सावंत

“काय झाले साहेब. तुम्हाला काय अट्टल गुन्हेगार अपेक्षित होता काय.” शिवा.

“बरोबर ओळखलेस.” इं.सावंत

“काय साहेब,सुशिक्षित खबरी नाही का असू शकत ? हा एक चांगला profession होऊ शकतो.आणि सेवाही.” शिवा.

“हम्म…नविन दिसतोस ह्या field मध्ये. पहिलाच attempt काय ?” इं.सावंत

“होय साहेब.. First and yet successful attempt.” शिवा.

“खबरी चा प्रत्येक attempt successful च हवा.. खबरीला खरी खबर देऊन जितका धोका गुन्हेगारान्कडून असतो त्यापेक्ष्या जास्त धोका पोलिसांना खोटी खबर देवून असतो.पोलिस नावाच्या जातिवार कधीच विश्वास ठेवू नकोस” इं.सावंत

“ते मी जाणुन आहे साहेब.” शिवा.

“ठीक आहे. मला आनंद आहे तुझ्यासारखे सुशिक्षित तरुण इतका धोका पत्कारयाला तयार आहेत हे पाहून. पैश्याची काही कमी पडणार नाही तुला. तुझ्या खबरेनुसार तुझा मोबदला आमच्या secrete fund मधून तुझ्या अकाऊंट मध्ये जमा होत राहील. हे फ़क्त आपल्या दोघात राहील. काहीही गरज पडली तर मला बिनधास्त फ़ोन कर.” इं.सावंत.

“धन्यवाद साहेब.” शिवा.

“ये तू आता.” इं.सावंत.

सावंतांच्या बोलण्याने शिवाला फार हुरूप आला. पोलिस खात्यात अजुनही इमानदार,कर्तव्यतत्पर माणस आहेत ह्याची त्याला सुखद प्रचिती आली.
आता शिवा अजुन जोमाने कामाला लागला. रात्री taxi चालवन्यापेक्षा taxi तील प्रवाश्यांवर त्याची चौकस नजर असायची. प्रत्येक प्रवाश्यात तो काही तरी शोधण्याचा प्रयत्न करीत असे. गुन्हेगार लोक आपापसात सांकेतिक भाषेत (code language) संवाद साधत म्हणून अश्या भाष्या अवगत करण्यासाठी आणि आतल्या खबरी काढण्यासाठी शिवा taxi चालवन्यावरच विसंबून न राहता टपोरी, गुन्हेगार लोकांमध्ये उठबस करू लागला. त्यात ओघानेच दारू, जुगार, बायका ह्याही गोष्टी आल्याच. सराईत गुन्हेगारांशी त्याची चांगलीच दोस्ती जमली. गुन्हेगारी जगताचे भयानक रूप त्याच्या समोर येत होते. मोठ्या गुन्हेगारांच्या पार्ट्या मध्ये जाण्याचा तो काहीही करून प्रयत्न करू लागला. त्यात तर पोलिस खात्याचे ही भयानक रूप त्याच्या समोर येऊ लागले. पोलिस शिपायाँपासून ते बरेच मोठे अधिकारी त्याला पार्टीत दिसू लागले. तेव्हा त्याचा फार मनस्ताप होत असे. वाटे की हे सगळे सोडून द्यावे पण सावंतांना दिलेला शब्द त्याला हे करू देत नसे..
शिवाच्या मेहनातिला फळ येऊ लागले. बरेच गुन्हेगारी कट त्याने दिलेल्या खबरीमुले उध्वस्त होऊ लागले. सावन्तांचा encounter चा आकड़ा आणि दरारा वाढू लागला. त्यांची राष्ट्रपदी पदकासाठीही निवड झाली. सावंतही शिवाच्या मेहनतिला आणि मदतीला जाणून होते..

त्यानी शिवाची थेट गृहमंत्र्याँशी भेट करून देण्याचे ठरवले..

गृहमंत्री जोशी म्हणजे अगदी clean personality. विरोधकही कधी त्यांच्यावर आरोप करायला धजत नसत. सैन्यात colonel पदावर कार्यरत असताना एका जेष्ठ राजकारणी महोदयांच्या विनंतीला मान देऊन राजकारणात प्रवेश केला. राजकारणातही त्यांच्या गुनांना हेरून त्याना गृहमंत्री पद देण्यात आले. त्याचा त्यांच्या बरोबरच्या मंत्र्याना फार हेवा वाटे. त्यांची काम करण्याची पद्धत ही सैन्याप्रमाने होती. ते मंत्रीपदी आल्यापासून त्यानी राज्यात फार धोरणात्मक सुधारणा केल्या. डांस बार, सट्टा,जुगार,मटका इत्यादी कायमचा बंद केला त्यामुले पोलिसांची वरकमाई बंद झाली. बीअर बार च्या वेळा तंतोतंत पाळल्या जाऊ लागल्या.
शहरे बंद सारखी आंदोलने, मिरवणुकातिल अभद्रपणा कमी झाला. पोलिसांच्या कामातील स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप कमी झाला.
Under World चा issue हा पोलिसी पद्धतीने न हाताळता army style ने हाताळला जाऊ लागला. पोलिस खात्यात तर अभूतपूर्व सुधारणा केल्यात. पोलिसाना physical fitness compulsory केली. पोलिसांचे पोट कमी झाले 🙂 पोलिस खात्यातील शस्त्रखरेदी कड़े गृहमंत्र्यानी जातीने लक्ष घालून अत्यंत आधुनिक हत्यारे पोलिस खात्यात खरेदी केली..

गृहमंत्र्यांची स्वतःची अशी विश्वासु पोलिस अधिकार्यांची informal टीम होती. पोलिस खात्यातील highest priority cases ही टीम संभाळत असे. ह्या टीम मधील अधिकार्याना विशेष अधिकार दिले होते. ही टीम गृहमंत्र्याना report करत असे. प्रत्येक अधिकारयाचे आपले एक नेटवर्क होते. ह्या टीम चे केंद्रातील national security शी संबंधीत खात्यांशी synchronization चालत असे.

गृहमंत्री निवास:

इ.सावंत : “साहेब, हा शिवा. राव, ठाकुर, गवळी gang च्या खबरी ह्यानेच दिल्या होत्या. solid network आहे पठ्य्याचे.. १००% पक्की खबर असते. मी शिवाबद्दल तुम्हाला आधी सांगितले होते.”

गृहमंत्री : “Yes. I know. I’m really impressed by Shiva. शिवा आत्तापासून आपल्या team मधील एक. But Informally.
Sawant, Shivaa will work with you. Provide him all the details about our team and its functioning. Also provide him all the facilities we provide to all our team players..

Shiva, now you have to work hard. काहीही problem असेल तर I’m always there for you.

शिवा : Thanx Sir. I will really work hard and won’t let you down..

गृहमंत्री : All the best..

गृहमंत्र्यांशी भेट म्हणजे एक पर्वणीच होती.. शिवाला अगदी Top of the world असल्यासारखे वाटत होते…

शिवा आता highest priority च्या केसेस वर कम करू लागला. त्यासाठी त्याला आपले नेटवर्क अजुन सक्षम बनवावे लागले.. जास्त धोके पत्करावे लागत होते. खबरीच्या कामातही promotion असते आणि ते अजुन जास्त धोकादायक असते ह्याचे त्याला प्रत्यंतर येत होते. पण शिवाला त्याचे दुःख वाटत नव्हते, उलट तो ते काम जास्त enjoy करत होता … That is called work satisfaction.

शिवाच्या मेहनातिला यश येत होते. त्याच्या टिप्स मुले आणि टीम मधील विरांच्या पराक्रमामुले त्यांनी अनेक देशविघातक कट उधलुन लावले..
शिवाच्या कामाची team मध्ये प्रशंसा होऊ लागली….
सावतांची ही २-३ promotions झाली..
गृहमंत्र्यांचा विश्वास शीवाने सार्थ ठरविला…सावंतांच्या,गृहमंत्र्यांच्या खाजगी लोकांमाधिल शिवा एक झाला. गृहमंत्र्यांची मर्जी त्याने संपादन केली.
एकंदरीत सर्व व्यवस्थित चालू असताना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक दुर्दैवी दिवस उगवला…

मुंबईतील शिवसेना भवन, नागपुरातील संघ कार्यालय, गणेश टेकडी मंदिर, दादर मधील अक्षरधाम मंदिर, सिद्धिविनायक, पुण्यातील दगडूशेठ गणपति मंदिर ह्या हिन्दू प्रार्थना स्थलांवर आणि हिन्दू राजकीय पक्ष्यांच्या कार्यालयांवर आतंकवादी हमले झाले.. आतंकवादी त्या त्या स्थलांमध्ये लपून बसले..त्यानी काही भाविकाना बंदी बनवले…संपूर्ण महाराष्ट्र हादरला…..संपूर्ण महाराष्ट्रात red alert पुकारण्यात आला…नाकाबंदी करण्यात आली….
भाविकांच्या सुटकेसाठी आणि आतंकवाद्याना कंठस्नान घालण्यासाठी दिल्लीहून NSG comandos पाचारण करण्यात आले.
NSG commandos आणि गृहमंत्र्यांच्या special team ने हे कार्य पूर्णत्वास नेले. सर्व भाविकांचा जीव वाचवण्यात यश आले..सर्व आतंकवाद्याना मृत्युदारी पोहचवले. ह्या ऑपरेशन मध्ये बरेच जवान आणि पोलिस शहीद झाले…
गृहमंत्र्यांच्या राजिनाम्याची मागणी जोर धरु लागली…परन्तु गृहमंत्र्यांचे एकंदरीत record पाहून आणि त्यांच्या नंतर इतके महत्वाचे पद सांभाळन्याची कोणाही मंत्र्याची लायकी नाही हे पाहून केंद्राने ती मागणी फेटालुन लावली….गृहमंत्री पदाचे स्वप्न पाहणारया उपमुख्यमंत्री दिलीपराव शिंदे,बांधकाम मंत्री आनंददादा पवार,महसूल मंत्री रामदास नागरे ह्यांचा भ्रमनिरास झाला…

महाराष्ट्र सावरला…

अश्याच एका दिवशी इ. सावन्तांचा शिवाला फ़ोन आला..त्यांनी शिवाला ताबडतोब बोलावून घेतले…

इ.सावंत: ये शिवा..बस..

शिवा: काय झाले साहेब ?

इ.सावंत: तुला गृहमंत्री साहेबांबद्दल काय वाटते ?

शिवा: हा काय प्रश्न साहेब.. माझे तर ते आदर्श आहेत. त्यांच्यासारखा कणखर, इमानदार, कर्त्तव्यतत्पर नेता सापड़णे अशक्य आहे. माणसांची त्याना परख आहे. राजकारण हा त्यांचा पिंडच नाही.. जे काही करणार ते राष्ट्रहितानुसारच करणार..

इ.सावंत: अगदी बरोबर. माझा पण कालपर्यंत हाच समज होता ..

शिवा: समज ?

इ.सावंत: हो समजच. इतक्या वर्ष्यांच्या पोलिस सेवेत गुन्हेगाराला एका नजरेत ओळखु शकणारा मी साहेबाना नाही ओळखु शकलो..

शिवा: साहेब, असे कोडयात बोलू नका…

इ.सावंत: महाराष्ट्रातील आतंकवादी हल्ल्यावर जी चौकशी समिती नेमली होती तिचा रिपोर्ट पुढच्या आठवड्यात येत आहे. त्यात I.S.I. वर ठपका ठेवण्यात आला आहे. I.B. मध्ये माझा मित्र खांडेकर आहे त्यानेच ही आतली बातमी दिली…

शिवा: I.S.I. चा हाथ आहे हे तर जगजाहीर आहे..

इ.सावंत: I.S.I. फ़क्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी. Inquiry करत असताना त्यात केंद्रातील आणि राज्यातील काही वरिष्ठ मंत्र्यांनी I.S.I. ला मदत केली हे उघडकीस आले आहे.

शिवा: वरिष्ठ मंत्री म्हणजे ? Please be specific.

इ.सावंत: वरिष्ठ मंत्री म्हणजे केंद्रातील गृहमंत्री कृपाशंकर नायर आणि आपले गृहमंत्री साहेब श्री जोशी.
ह्या दोघंव्यतिरिक्त अजुन बरेच महाभाग मंत्री आहेत. परन्तु केंद्रातील गृह खाते हे कृपाशंकर नायर यांच्याकडे असल्याकारणाने त्यानी अहवालात बदल करून सर्व मन्त्र्यांवारील आरोप नाहीसे केले आहेत.

शिवा: माझा विश्वास नाही बसत.

इ.सावंत: माझा पण नव्हता, पण खांडेकरांनी जेव्हा मला साहेबांची कुंडली काढून दाखवली तेव्हा त्यावर विश्वास करण्यापलिकडे मी काहीच करू शकत नव्हतो. साहेब सैन्यात असताना सैन्यातील शस्त्रास्त्रे आतंकवाद्याना विकण्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि त्यात त्यांचे court martial होणार होते. पण साहेबांवर त्यावेळच्या संरक्षणमंत्र्यांचे कृपाछत्र होते आणि त्यानी वेळ निभावुन नेउन ही खबर बाहेर न येऊ देता साहेबांची त्या आरोपातुन सुखरूप मुक्तता केली..

शिवा: पण इतकी मोठी भानगड जनतेच्या समोर कशी नाही आली..

इ.सावंत: मोठी भानगड फ़क्त जनतेसाठी. ह्यांच्यासारख्या प्रस्थान्साठी हा फ़क्त एक उजेडात न आलेला गुन्हा आणि तो ही manage करण्यासारखा. सत्य जनतेला किती टक्के सांगायचे हे संपूर्णपणे ह्यांच्या हातात…जर सत्य १००% सांगितले तर तर ते सत्य न राहता कटुसत्य होते. म्हणून ही मंडळी जनतेला त्यांच्या अनुरूप सत्य सांगतात. कोणता नेता जनतेला स्वतःची संपत्ति उघडपणे सांगतो, किवा कोणता नेता/खासदार सरकार कडून आपल्याला किती निधी मंजूर झाला ते स्वत:हून सांगतो.
पत्रकारिता तर ह्यांची हक्काची marketting agency झाली आहे… पैसे देऊन आपल्या बाजुच्या बातम्या छापून जनतेत आपले खोटे चित्र उभे करतात.
Sorry,I’m digressing.
पुढे त्या संरक्षणमंत्र्यांची केंद्राच्या गृहमंत्रीपदी वर्णी लागली आणि आपल्या मर्जितला माणुस म्हणून त्यांनी पक्षश्रेष्टिवर दबाव टाकुन साहेबांची महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदी वर्णी लावली..

शिवा : हे कितीही खरे जरी असेल तरी साहेब हे हिन्दू आहेत आणि झालेले हल्ले हे तर हिन्दू धार्मिक स्थलांवर होते…साहेब आपल्या धर्माशी अशी प्रतारणा नाही करू शकत.

इ.सावंत : अरे ज्यांनी देशाशी प्रतारणा केली त्यांच्यासाठी धर्मं काय चीज आहे. पैसा हाच खरा देव. सत्ता हाच खरा धर्मं. जर उदया एखाद्या निष्पाप लहान मुलांच्या अनाथ आश्रमावर हल्ला करण्याची योजना जरी बनली तरी ह्यांचा त्याला विरोध नसेल..
ह्यांनी आमच्याकडून त्यांच्या सोइनुसार encounters करून घेतलीत..तुला आठवते आम्हाला शेट्टीची encounter करायची order नव्हती कारण शेट्टी च्या धंद्यात यांचीही partnership होती..

जवळच्या माणसाने पाठीत खंजीर खुपसावा आणि तो खेचून पुन्हा पुन्हा खुपसावा अशी शिवाची अवस्था झाली…
शिवा आता नेहमीचा शिवा राहिला नव्हता तर तो सत्तेच्या पटावरील एक प्यादा बनला होता ज्याला साहेबानी आपल्या कामासाठी वापरले.

शिवा: काय आपण इतके हतबल आहोत की इतके सगळे आपल्या समोर होत असुनही आपण मूक पाहत रहायचे.?

इ.सावंत : त्यासाठीच मी तुला बोलावले आहे…

मी साहेबाना, एक देशद्रोह्याला असे सोडणार नाही.
मी ह्या देश्द्रोह्याचा वध करायचे ठरविले आहे… हो, तो एक एनकाउन्टर, खून नसून एक वध असणार…
जीव गेला तरी पर्वा नाही पण आता खाकी वर्दितिल शंढ म्हणून रहायचे नाही…
एक वचन दे. माझ्यामागे माझ्या कुटुम्बाकड़े लक्ष्य देशील. तूच एक माझ्या विश्वासताला आहेस .

शिवा: साहेब एक विनंती आहे. हे काम माझ्यावर सोपवा. तुमच्यामागे ३ जीव आहेत. त्यांचे भविष्य तुमच्यावर अवलंबून आहे. एका देश्द्रोह्यासाठी त्यांचे भविष्य अंधकारमय करू नका. माझ्यामागे फ़क्त माझी आई आहे म्हणून तुम्हीच मला वचन द्या की तुम्ही माझ्या आईची काळजी घेणार..

इ.सावंत: हे शक्य नाही. आम्हा पोलिसांचे हे कर्त्तव्य आहे..ते आम्हालाच पार पाडू दे..

शिवा: आपण आपल्या घरी चोरी होत असताना फ़क्त पोलिसांची वाट पाहतो काय ? First Aid हे ज्याचे त्यालाच करायचे असते. इथे प्रत्येक नागरिक एक सैनिकच आहे.. आजचे हे माझे मागणे नाकारू नका….तुमची मुले तुमची वाट पाहत आहे आणि माझा देश माझी…

(फार विनवणी करून शिवाने सवान्तांची परवानगी घेतली)

दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे गृहमंत्री जोशी morning walk करत असताना शिवाने त्यांचा वध केला…
गृहमंत्र्यांच्या अंगरक्षकान्नीही शिवाच्या शरीराची bullets ने चाळणी केली…
मरताना शिवाच्या चेहर्यावर एक अल्लौकिक तेज होते..अगदी war front वरील शाहिदासारखे…..

संपूर्ण महाराष्ट्र गृहमंत्र्यांच्या मृत्युने स्तब्ध झाला….

२ दिवसानंतर……

स्थळ: बांधकाम मंत्री आनंददादा पवार ह्यांचे निवासस्थान

उपस्थित: मुख्यमंत्री वसंतराव देशमुख, उपमुख्यमंत्री दिलीपराव शिंदे, बांधकाम मंत्री आनंददादा पवार, महसूल मंत्री रामदास नागरे, उर्जा मंत्री मानिकराव गायतोंडे, इंस्पेक्टर सावंत.
रामदास नागरे: Three Cheers for our victory… पवार साहेब मानले पाहिजे तुम्हाला.. काय गेम खेळलात
आनंददादा पवार: अहो आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते…खरे आभार मानायचे तर मुख्यमंत्री साहेबांचे माना..त्यानी हिरवा कंदील दिला नसता तर हा गेम बनलाच नसता..

मुख्यमंत्री वसंतराव देशमुख: काय चेष्टा करतात राव….आम्हाला फ़क्त इतकेच कळते की इतकी माया जमवा की पुढच्या ७ पिढयाना No Tension…

उपमुख्यमंत्री दिलीपराव शिंदे: हो ना राव. नावाचा उपमुख्यमंत्री होतो मी. सगळे अधिकार त्या जोश्याकडे. ईमानदारीचा कळसच केला होता त्याने. स्वत पण खात नव्हता आणि आपल्याला पण खाऊ देत नव्हता….
आता माझ्याकडे गृहमंत्री पद आले की सर्वांची चांदी… खा किती खायचे ते …

इंस्पेक्टर सावंत: अहो आमच्या पोलिस खात्याची तर वर कमाईच बंद केली होती त्याने. अहो डांसबार बंद, सट्टा बंद, हफ्ते बंद….वैताग आला होता नुसता…आम्ही तर आम्ही, घरी बायका-पोर पण परेशान. सरकारी पगार काय असतो ते ह्या २ वर्श्यात कळले…
साहेब तेवढे आमच्या promotion चे बघा म्हणजे झाले..

उपमुख्यमंत्री दिलीपराव शिंदे: अहो म्हणजे काय….कमिश्नर झालेच म्हणून समजा तुम्ही ..अरे सावंत त्या शिवाला कसे खेळवले ते सांग आमच्या मुख्यमंत्री साहेबाना…

इंस्पेक्टर सावंत : त्याचे काय साहेब आपल्या देशात सुशिक्षित बेरोजगारांची बिलकुल कमी नाही.. पायलीला ५० मिळतील…असाच एकदा गवसला….पट्ठा मात्र कामाचा होता, तेज होता….Department च्या पैश्यातुन त्याचा पगार जायचा, टिप्स मात्र आपल्या कामाच्या द्यायचा….जोशी साहेबांचा परम भक्त…जोशीसाहेबाना खलनायक म्हणून पेश करताना त्याचा जाम brain wash करावा लागला.जोश्यांसाराख्या देवमाणसाबद्दल काय काय खोटे बोलावे लागले.त्याला काय माहित खरे खलनायक आपणच आहे ते…
बिचारा जोशी देव माणूस होता पण ह्या देशात लोक दगडाला देव मानायला तयार होतात पण माणसातला देव कोणी ओळखत नाही.
खरे सांगतो साहेब आजकालची पीढ़ी देशासाठी काहीही बलिदान करू शकते…
बिचार्या शिवाला मरेपर्यंत वाटत होते की जोश्याना मारून आपण देशासाठी शहीद होत आहोत.पण त्याला काय कल्पना त्याचा मृत्यु तर आपण विकत घेतला होता….
मरेपर्यंत त्याला कळल़े नाही की सत्तेच्या पटावरील तो फ़क्त एक प्यादा होता.

जोश्यांचा वध करण्यासाठी गेला आणि त्याचाच encounter झाला….

पोलिस खात्यातील एक अदभुत एनकाउन्टर ….. एका खबरीचा एनकाउन्टर…

Advertisements
प्रवर्ग: कथा
 1. Atul Deshmukh
  जानेवारी 6, 2010 येथे 12:00 सकाळी

  ६ जानेवारी, अनिलचा वाढदिवस,
  माझे हे चक्रव्यूह म्हणजे अनिलला वाढदिवासतार्फे एक जिव्हाळयाची भेट..

 2. जानेवारी 6, 2010 येथे 1:31 pm

  गुगवून ठेवलं. जबरदस्त लेखन.

  • Atul Deshmukh
   जानेवारी 6, 2010 येथे 5:25 pm

   @आशाजी
   धन्यवाद् आशाजी…आपण आपला वेळ माझ्या ब्लॉगला दिल्याबद्दल…
   आपल्यासारख्या वाचकांच्या कौतुकाने ने कामाचे चीज झाल्यासारखे वाटते…
   अजुन अधिकाधिक चांगले लेखन करण्याचा प्रयत्न करेन…
   पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद ..

 3. आल्हाद alias Alhad
  जानेवारी 6, 2010 येथे 5:48 pm

  छान कलाटणी!

  • Atul Deshmukh
   जानेवारी 7, 2010 येथे 5:54 सकाळी

   @आल्हाद
   धन्यवाद आल्हाद,
   माझ्या लेखनाला वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार
   उत्तरोत्तर अजुन दर्जेदार लिहिण्याचा प्रयत्न करेन

 4. जानेवारी 6, 2010 येथे 7:48 pm

  दाद देण्यासारखे झाले आहे…मस्तच… बरीच वास्तवता आहे हयात आणी तेच आपले दुर्दैव आहे.

  • Atul Deshmukh
   जानेवारी 7, 2010 येथे 6:09 सकाळी

   धन्यवाद देवेन्द्र प्रतिक्रियेबद्दल,
   आपल्या राज्याची आणि एकुणच देशाची अशीच भयंकर परिस्थिति आहे सध्या…
   ९०% नालायाकन्विरुध १०% कर्तुत्वान,इमानदार लोकांचा सामना असतो….
   एरव्ही एकमेकांची तोंडही न पाहणारी ही नालायक मंडळी कर्तुत्वानाना विरोध करायला आणि आपले हितसंबंध जप्न्यास एक होतात आणि तेव्हा निर्माण होतो एक चक्रव्यूह ज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बर्याचदा मृत्युतुन जातो…हीच आपली शोकांतिका..

 5. Deepti
  जानेवारी 8, 2010 येथे 1:31 सकाळी

  अतिशय जबरदस्त लेखन केलं आहेस. वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची ताकद आहे. अप्रतिम !!!

  • Atul Deshmukh
   जानेवारी 8, 2010 येथे 12:09 pm

   धन्यवाद दीप्ती..
   कथेला वेळ दिल्याबद्दल…

 6. Anil Awasare
  जानेवारी 8, 2010 येथे 11:58 सकाळी

  Vow wat a nice story, and thanx a lot for dedicating to me on my b’day. asach lihit zaa chaan.

 7. Sneha
  जानेवारी 15, 2010 येथे 10:23 सकाळी

  Hey Atul tuze he hidden talent mahit navte mala..
  gr8 yaar.. u write really well.
  I read all 3 of ur stories.. they are fab.. gud going 🙂

 8. Atul Deshmukh
  जानेवारी 15, 2010 येथे 1:07 pm

  Hi Sneha,
  Thanx a lot for ur precious time.
  Reaaly a gud feeling knowing ppl like our work..
  Thanx a lot once again..

 9. जानेवारी 20, 2010 येथे 11:02 सकाळी

  Good going Atul. Thank you for pointing me to your blog. I have marked it in my RSS bookmarks and will keep on visiting.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: