Archive

Archive for the ‘नाती’ Category

आजोळ

सप्टेंबर 13, 2009 12 comments

आजोळ….
उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्हाला गावी जाण्याचे वेध लागे. लग्नसराई असायची म्हणुन सर्व नातेवैकांच्या भेटीगाठी होतील हा विचार आई बाबांच्या गावी जाण्याच्या निर्णयामागे असायचा. आमचे आजोळ विदर्भातील एक खेडेगाव अणि वडील नौकरी निमिताने नाशिक जिल्ह्यातील मनमाड(रेलवे जंक्शन) येथे स्थाईक म्हणुन शक्योतो विशेष कारण असेल तरच जावे कारण फार लांबचा पल्ला होता आणि त्याला जोडून अर्थकारणही होतेच.
असो, थोड़े अवांतर, आई बाबांचे लग्न आत्या घरी भाची असे जमुन आले. वडिलांची आई वडील चौथित असतानाच आजाराने वारली. मग वडिलांचा साम्भाळ आईच्या बाबांनी म्हणजे आजोबानी करण्याचे ठरवले. आईचे काका हे मुख्याध्यापक होते. त्यानी वडिलांच्या शिक्षणाचा वसा उचलला. एकंदरीत, आमचे आजोळ म्हणजे आईकडचे.
आईचे माहेर म्हणजे एकत्र कुटुंब, आजोबाना 3 भाऊ , १ बहीण (वडिलांची आई). आईचे बाबा सगळ्यात थोरले, गावाचे पाटिल, गावातली पहिली विहीर त्यानीच बांधलेली, बैल पोळ्य़ाच्या सणामध्ये पहिला मान आजोबांच्या बैलजोडीला.
मला ४ मावश्या अणि एक मामा, मामा थोरला, मामा फॉरेस्ट ऑफिसर, कोणाची मजाल की कोणी त्याच्याशी वाद घालेल तर, लोक त्याला जंगलाचा सिंह म्हणतात. आईच्या घराचा आणि आईच्या काकांच्या घराचा गोतवाला धरला तर घरच्या लग्नासमारम्भाला बाहेरच्या लोकांची गरज नको इतका मोठा.
आईचे माहेर एक खेडे होते. त्यात बस जात नव्हती, जवळच्या बस पोहाचनार्य गावाहून ५-६ किमी पायपीट करून जावे लागे पण आम्हाला त्याचा त्रास होत नसे कारण गावी जाण्याचा आनंद काही औरच होता. गावातल्या मजेची सर कश्यालाही येणार नाही.
आमचे फार मोठे शेत होते. फार मोठी अमराई होती. रोज शेतात जाने, तिथल्या गडयाना वेगवेगले प्रश्न विचारावे, मग त्यांचे काम आपण करून पाहावे (नांगर चालविने, गाईचे दूध काढ़ने, बैलगाडी चालविने, बैलाना पाण्यासाठी घेवून जाणे अणि इतर ). फार मजा यायची ती कामे करताना, गुंग होऊं जात असू.
तो काळ काही औरच होता.
मला अजुनही आठवते, जर गावातल्या मुलाचे लग्न असेल तर, वर्हाडी मंडळी बैलगाडी वर जात, प्रत्येक घर आपली बैलगाडी घेवून जात असे, बैलगाडयाचा ताफा निघत असे. सगले लोक आपल्या घरचे लग्नच समजत असत.
गावातल्या मुलीचे लग्न असेल तर गावातल्या प्रत्येकाला वाटे की आपल्याच घरचे  लग्न आहे. प्रत्येकजण झटुन काम करी.
गावातली लग्न पण विचारायला नको. लग्नाचा दिवस नसून लग्नाचा पंधरवाढाच असे.
घरचे लग्न असेल तर माझ्या मावश्या त्यांची मूल १५-20 दिवसापासून येत, आम्ही दुरून आलो हे पण त्याला एक कारण होते. मग काय मामा,माव्श्यांची पोर,एकाच धमाल असायची.अन्ताक्षरी,क्रिकेट, असे बरेच उद्योग चालायचे.
रात्रि आईचे काका आम्हाला टिपिकल गावाच्या स्टाइल मध्ये गोष्टी रंगवून सांगत, त्यातले काही शब्द कळत नसत.फार मजा यायची. गावातल्या त्या रात्री अविस्मरणीय असायच्या. अजुन एक वेगले व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या आईची आजी म्हणजे माझी पणजी, शम्भरी गाठली होती त्यानी. इतके जगुनही तरुनाना लाजवेल असा त्यांचा उत्साह होता. त्या संध्याकाली भावगीत गात. असाच एक प्रसंग सांगावयास वाटतो.
एकदा अशीच मैफिल बसली असताना, माझ्या पणजीने माझ्या मामेभावाला गा म्हणुन सांगितले. त्याला तर काही अश्या गाण्याचा गंध नव्हता . वेळ काढून नेण्यासाठी त्याने ‘ओये ओये’ हे त्रिदेव सिनेमातले (त्या काल़ी हे गाणे म्हणजे एकदम super hit) गाणे गायला सुरवात केली. पणजी म्हणाली हे कुठले रे गाणे मी तर कधीच नाही ऐकले. तर त्याने संदर्भासहीत स्पष्टीकरण दिले की एका मोठ्या संताने तीनही देवाना (त्रिदेव) समर्पुन हे गाण गायले आहे. आम्ही हसत होतो अणि पणजी बिचारी गाणे ऐकत होती.
एकुणच सांगायचे तर असे ते सोनेरी दिवस होते. आईचे काका,काकू,आजी,आई,बाबा कोणीही आता नाहीत. म्हणुन आईला पण आता तिकडे जावेसे वाटत नाही. सगल्या मावश्या,मामा यांची परिस्थिति आइपेक्ष्या वेगळी नाही. आम्ही सगळी नातवंड आपापल्या करियर मध्ये व्यस्त आहोत ..काहींचे लग्नही उरकले. आता भेट फक्त काही कार्यक्रम असेल तरच होते. पाहिले लग्नाच्या कितीतरी दिवस अगोदर जायचो आता या धकाधकीच्या दिवसात तर हळदिच्या दिवशीचे प्लानिंग केले तरी खुप झाले. एक एक दिवसाच्या सुट्टीसाठी टीम मेनेजर ला कन्विंस करावे लागते…काळानुरूप नाती वीरळ होत जातात हेच मी प्रत्यक्ष अनुभवत आहे..

आता फक्त ते दिवस आठवुणच त्यात रममाण व्हावेसे वाटते. ते आता अनुभवता येत नहीं याचे दुख ही होते.

अजुन एक शल्य म्हणजे आपण जो आनंद अनुभवाला त्यात रममाण तरी होऊ शकतो पण आजकालच्या चिमुकल्याना तर ह्या धकाधकीच्या आयुष्याने ते सुख,ते आजोळच पारखे झाले आहे.

Advertisements
प्रवर्ग: नाती