Archive

Archive for the ‘विडंबन’ Category

स्त्री’वाद’–एक ‘वादा’तीत विडंबन

सप्टेंबर 20, 2009 4 comments

स्त्री‘वाद‘

नवरात्र उत्सवातील एक संध्याकाळ.

विष्णुंचा मोबाइल ट्रिंग ट्रिंग…ट्रिंग ट्रिंग

नारद : हेलो…हेलो

विष्णु : बोल नारद. (कदाचित नंबर save केलेला असेल).

नारद : मला तुम्हाला भेटायचे आहे. कधी येऊ??

विष्णु : अरे तुला कधीपासून परवानगीची गरज पडायला लागली?

नारद : ते नंतर सांगतो. आधी येऊ की नको ते सांगा.

विष्णु : हो रे बाबा. ये…

(नारद आलेत…)

विष्णु : बर. कस येण केलस? सर्व कुशल मंगल आहे ना.

नारद : हो. अगदीच. एकटेच आहात? लक्ष्मी वाहिनी कुठे गेल्यात?

विष्णु : अरे नवरात्र आहे ना. खरेदी करायला गेली आहे. भूतलावर…पुण्याच्या तूळशी बागेत….

नारद : बर..

विष्णु : बर??…परवानगी का मागत होतास मघाशी? हे अचानक असले सोपस्कार का पालायला लागलास?

नारद : तुम्ही लक्ष्मी वहीनीना काही सांगणार नसाल तर सांगतो..

विष्णु : नाही रे सांगणार…बिनधास्त बोल.

नारद : अहो असाच एकदा तुम्हाला शोधत तुमच्या घरी आलो. तुम्ही घरी नव्हता. लक्ष्मी वाहिनी होत्या. त्यानी आदरातिथ्य तर केले पण दम पण भरला की स्वामिना खाजगी आयुष्य पण आहे. असा अचानक टपकत जाऊ नकोस. आधी फ़ोन करत जा अणि मग स्वामीनी (माझी सम्मति घेऊन ) तुला सम्मति दिल्यावरच येत जा..
तेव्हापासून जो धसका घेतलाय ते आता urgent काम होते म्हणुन फ़ोन करून आलो..

विष्णु : (रागाने) अपमान. घोर अपमान. माझ्या परम भक्ताला मला भेटायला फ़ोन करून यावे लगते. (फार विचार करून अणि शांत होउन) पण त्याला माझा पण नाइलाज आहे…होम मिनिस्टर पुढे मी पण हतबल आहे.

नारद : पण प्रभु, तुम्ही विश्वाचे स्वामी अणि असे हतबल??

विष्णु : मी असेल रे जगाचा स्वामी पण आमची पण स्वामिनी आहे ना आमच्या वर. भुतलावारिल नवरे मंडळी आणि आम्ही समदुखी आहोत. ते जाऊ दे.. काय काम काढलेस?

नारद : आहे बाबानी (ब्रह्मदेवानी). आपल्याला ताबडतोब घेउन यायला सांगितले. काही तरी भानगढ़ आहे.. चला लवकर. ते वाट पाहत असतील आपली.. केव्हापासून मिस कॉल येत आहेत त्यांचे.

विष्णु : चल नारद चल. ब्रह्मद्न्या म्हटले की गेलेच पाहिजे.

दोघेही ब्रह्मदेवाच्या घरी जातात…

ब्रह्मदेव : नमस्कार…या प्रभु या…अहो कधीपासुन वाट पाहत होतो तुमची.

विष्णु : माफ़ करा प्रभु. (जसे भूतलावर दोन राजकारणी भेटले की एकमेकाना मान देण्यासाठी एकमेकाना साहेब साहेब म्हणुन संबोधतात तसे देवलोकात आपले त्रिदेव (ब्रह्म,विष्णु,महेश) एकमेकाना प्रभु प्रभु म्हणुन संबोधतात).

ब्रह्मदेव : तर विषयाला हात घालतो. आपल्याकडे भुतालावारून तेथील बायकांचे एक शिष्टमंडल आले आहे. भुतलावारिल बायकांच्या समस्या घेवून. माझे स्त्रियांच्या बाबतीत knowledge थोड़े कच्चे आहे म्हणुन म्हटले तुम्हाला अणि महेश प्रभुना बोलावून घ्यावे. महेश प्रभुना नंदी घेवून निघाला आहे कैलासावरून.

हे काय आलेच ते …

(महेश प्रभुना पाहून)

विष्णु : अलभ्य लाभ…अलभ्य लाभ. किती दिवसानी आपण तिघे एकत्र भेटत आहोत. आजकालच्या ह्या धकाधकीच्या कलियुगात महीनो महीने भेटच होत नाही.

महेश प्रभु : नमस्कार…नमस्कार. मला रस्त्यात नंदीने सांगितले की कोणी तरी बायकांचे शिष्टमंडल आले आहे म्हणुन भुतालावारून….

ब्रह्मदेव : छान…तर नारदा प्रभुना शिश्तमंडलातिल बायकांची ओळख करून दया. किंबहुना त्यानाच सांग इंट्रो द्यायला.

नारद: शिष्टमंडलात ५ सभासद आहेत. सौ. शहाने, सौ नेने, सौ डोइफोडे, सौ पोटदुखे, कुमारी जवळकर. ह्या सर्व क्रमाक्रमाने येउन इंट्रो देतील….

सौ.नेने : मी मधुरा नेने…वय वर्षे ३५, मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका आहे. आमचे हे बँकेत मेनेजर आहेत. बँकेचा हिशोभ संभालता, पण घराचा साधा हिशोब लावता येत नाही. आमची २ मूल. थोरला सहावी तर धाकटा चौथी मधे आहे. माझे सासरे म्हणजे देवमाणुस, सासु मात्र खट्याळ अणि ती ननंद तर.. (मधेच नारद सौ नेनेना हाथ जोडून बस करा म्हणुन सांगतात.. सौ नेने नारादावर खेकसून आवरते घेतात.)

सौ शहाने : मी तेजस्विनी शहाने. वकीलिचा व्यवसाय करते. बायकान्च्याच केसेस घेते. विशेषतः हुंडाबंदी, सासर्च्यान्कडून अत्याच्यार, वडिलांच्या प्रोपर्टी मधे मुलीला हक्क मिलवुन देने, नवर्याकडून घटस्फोट मिलवुन देणे, घटस्फोटानंतर पोटगी मिलवुन देणे, असल्या केसेस मधे माझा हातखंडा आहे. (रागाने)नवर्याबद्दल काही सांगण्यासारखे नाही.

सौ डोईफोडे : मी संजीविनी डोईफोडे. डॉक्टर आहे, आड़नावावर जाऊ नका, नेत्ररोगतद्न्य नसुन स्त्रीरोगतद्न्य आहे.. मुद्दाम ह्यात specialization केले. स्त्रीभ्रूण हत्तेला माझा तीव्र विरोध आहे. असल्या केसेससाठी पार्टी आली की मी त्याना पहिले पुलिस स्टेशनचा रास्ता दाखवते. नवरा दिल का डॉक्टर आहे(हार्ट स्पेसिअलिस्ट). मूलबाळ अजुन तरी नाही.

सौ पोटदुखे : मी जठरा पोटदुखे. पत्रकारितेचा कोर्स केला आहे पुणे पिद्यापीठतुन. आमच्या अपार्टमेन्ट मधील ‘घरोघरी’ ह्या महिला मंडलाची ३ वर्षांपासून निर्विवाद अध्यक्षा आणि मंडलाच्या ‘कानोकानी’ ह्या सप्ताहिकाची संपादिका. एखादी च्या नवर्याची, सासु-सुनेच्या भांडणाची, नवरा-बायकोच्या रुसवा-फुगव्याची, एखादीच्या पोरीच्या पलुन जाण्याची इत्यादी… बातमी..सॉरी खबर…जर कळली आणि दिवसभरात जर संपूर्ण अपार्टमेन्ट च्या कानोकोपर्यापर्यंत नाही पसरली तर आडनाव बदलून देइन. (रागाने) पण आमच्या ह्याना माझ्या ह्या skills चे काडीमात्र कौतुक नाही. सारखी माझी खिल्ली उडवत मला ‘गावभवानी’ म्हणत असतात.
बर दोन शब्द संपवून आपला निरोप घेते ..

जुई जवळकर : मी कु. जुई जवळकर. वय सांगणार नाही. लहानपनापासून बाबांचे मला मोठे डॉक्टर किवा इंजिनियर करण्याचे स्वप्न होते. पण मला मात्र अभ्यासात काहीएक इंटेरेस्ट नव्हता. म्हणुन दहावी मध्ये आम्ही लावलेले दिवे पाहून, बाबानी मला कला शाखेत प्रवेश घेवून दिला. तर तुम्ही म्हणाल अभ्यासात इंटेरेस्ट नव्हता तर कशात होता, तर सांगते. मला मिस वर्ल्ड व्ह्यायचे आहे (कदाचित मिस वर्ल्ड साठी सुन्दर असण्याची पात्रता दुय्यम असते.:)).
तर असो, त्या दृष्टीने माझे प्रयत्नही चालले आहेत. अणि एकदा की मिस वर्ल्ड झाले मग नंतर सिनेमात काम करावे लागणार म्हणुन आत्तापसुनच अभिनयाचा क्लास लावला आहे,त्या जोडीला डांस क्लास, मॉडलिंगचा क्लास, पेर्सोनालिटी डेवेलोप्मेंट चा क्लास, इंग्लिश स्पीकिंग चा क्लास, एरोबिक्स चा क्लास अणि फोअर अ चेंज म्हणुन योगा क्लास.
काय सांगू संपूर्ण दिवस वेगवेगळ्या क्लास्सेस मधेच जातो. चैलेन्ज देऊन सांगते की एक दिवस तुमच्या त्या उर्वशी,मेनका,रम्भा माझ्याकडे पाणी भरायला असतील..
सगळी मंडळी चाट…..

नारद : हुस्श…संपल एकदाचे ह्या बायकांचे….कित्ती बोलतात ह्या…….

ब्रह्मदेव : हा, तर आपले येण्याचे काय प्रयोजन? की आलेत हवा पाणी बदलायला.तसे असेल तर आपण आमचे अतिथि आहात.आणि अतिथि देवो भवः…

सौ शहाने : आम्हाला हवा पाणी बदलण्यासाठी इतक्या दूर यायला वेळ नाही. त्यासाठी आमच्या इकडे बरीच ठिकाण आहेत. आम्ही इकडे आमच्या काही मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आलो आहोत…..

ब्रह्मदेव : मागण्या? त्यासाठी तुम्ही आपल्या सरकारकडे जा, संप करा, उपोषण करा ते समर्थ आहेत.

सौ शहाने : नाही. आमच्या मागण्या आपण सृष्टी निर्माण करताना केलेल्या ह्या fundamental design flaws बद्दल आहेत.

तुम्ही सृष्टि निर्माण करताना जो भेदभाव केला तो तुम्हास निदर्शनास आणुन द्यायचा आहे आणि तो भेदभाव दुर करण्यासाठी काही मागन्यारूपी सूचना करायच्या आहेत.

ब्रह्मदेव : बर..काय आहेत तुमच्या मागण्या?

सौ शहाने : आमच्या काही मागण्या पुढीलप्रमाणे…..

१: आमचे असे ठाम मत आहे की, तुम्ही स्त्रीची निर्मिती करताना मुद्दाम तिला पुरुषयांपेक्ष्या शाररिक दृष्टीने दुर्बल म्हणजे अबला बनविले आहे. आम्ही तुमच्या ह्या कृतीचा अखिल स्त्री वर्गाकडून जाहिर निषेध करतो. आणि स्त्रीयानाही पुरुश्यनित्केच शारीरिक सामर्थ्य देण्याची मागणी करतो..

२: अपत्य जन्माला घालण्याची जबाबदारी फ़क्त स्त्रीची असू नए. त्याच प्रकारची शाररिक रचना पुरुश्यान्मधेही निर्माण करावी. अणि ९ महीने पोटात मुलाचे संगोपन कोण करणार हा निर्णय सर्वस्वी नवरा-बायको वर सोपवावा..

३: वन्शावळ ही फ़क्त पुरुश्यांच्या नावाने न रहता त्याला समांतर अशी स्त्री वन्श्यावळ असन्याचाही नियम करावा.

४: लग्नाविधि आणि इतर पूजाविधी मध्ये पुरुषाला मुद्दामहून जास्त महत्व देण्यात आले आहे अणि स्त्रीला फ़क्त
सहचरणी म्हणुन दुय्यम स्थान देण्यात आले आहे. म्हणुन आमची मागणी आहे की सर्व वेद, उपनिशदे आणि इतर ग्रंथात सखोल संशोधन करून स्त्रीचे स्थानही पुरुशानित्केच महत्वपूर्ण करावे.

५: सातोजन्मी हाच पति लाभों म्हणुन वटसवित्रिचा जो उपवास आहे तो पूर्णत: ऐचिक असावा. कुण्या स्त्रीला जर चुकून आपला नवरा आवडलाच तर पुढल्या किती वर्श्यांसाठी ते ध्यान वागवायचे हे इच्चिन्याचे तिला संपूर्ण स्वातंत्र्य असावे. साताजन्मांचा पाढा वाचू नए..

६: तसेच जर एखादीला आपला नवरा आवडला नाही तर घटस्फोट देन्याबरोबराच पुढील कुठल्याही जन्मात हे ध्यान नशिबी पडणार नाही याची शास्वती मिलन्यासाठीही काही तरी उपाय सुचवावा.

७: तुम्ही त्रिदेव पुरुष असल्याने स्त्रीयांबद्दल निर्णय घेताना तुम्ही पक्षपात करण्याची दाट शक्यता आहे, म्हणुन स्त्रीयांबाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास आदिशाक्तिशी सल्लामसलत करावा. मगच निर्णय घ्यावा.

८ : आमच्या असेही निदर्शनास आले की भुतालाप्रमानेच स्वर्गलोकिही सर्व महत्वाची पदे ही पुरुष जातीकडे आहेत. कृपया याची नोंद घेवून योग्य ती कार्यवाही करावी.

९: आपण आमच्या ह्या मागण्या हलक्याफुलक्या धमक्या समजू नए म्हणुन आमच्या शक्तीचे द्योतक म्हणुन भुतालावारिल सरकारकडून आम्ही हिसकावून घेतलेले काही आरक्षणवजा स्वातंत्र्य नमूद करत आहोत …

जसे, शैक्षणिक क्षेत्रात,सरकारी नोकरीत,संसदेत अणि इतर सरकारी उप्क्रमान्मध्ये ३०% आरक्षण.

विमान सेवा(एयर होस्टेस),अरोग्यसेवा(नर्सेस वगैरे) यात कमीत कमी ९०% आरक्षण.

सरकारी बसेस मध्ये ५०% आरक्षण.

बैंकतुन कर्ज घेताना आरक्षण.

नवरयाचा महिन्याचा पगार पहिल्या दिवशीच घेवून ती आपल्याच कष्टाची कमाई आहे असे समजुन मनसोक्त खर्च करण्याचे स्वातंत्र्य.

स्वतः काही एक नसताना डॉक्टर नवर्याच्या पुण्याईणे डॉक्टरिन बाई, किवा मास्तर नवर्याच्या पुण्याईणे मास्तारिन बाई असे बिरुद मिरवन्याचे स्वातंत्र्य.

स्वत: नौकरी करत नसताना matrimony site वर नौकरी करणाराच नवरा पाहिजे अशी अपेक्षा म्हणुन लिहिण्याचे स्वातंत्र्य.

नौकरीत कितीही चूका केल्यात तरी टीम मेनेजर कडून appreciate mail मिलविन्याचे स्वातंत्र्य .

आपले काम कधीही वेळेवर पूर्ण न करता मेनेजरला आपल्या घरच्या कामाच्या व्यापाचे कारण देऊन त्याला सेंटी(मेंटल) करण्याचे स्वातंत्र्य.

तेच उरलेले काम मग male collegue ला गोड स्माइल देवून त्याच्या माथी मारण्याचे स्वातंत्र्य.

रात्रि सुरक्षिततेचे कारण देवून ऑफिस मधून ६ वाजताच कलटी मारण्याचे स्वातंत्र्य .
..आणि इतर नमूद न करण्यासारखे बरेच काही….

(वरील पराक्रम ऐकून ब्रह्म,विष्णु,महेश,नारद चाट पडतात आणि स्त्री शक्तिला घाबरून निर्णय लाम्बवन्याचे काम विष्णुन्वर सोपवतात )

विष्णु : आपल्या काही मागण्या योग्य असून बरयाच मागण्या विचार करूनच निर्णय घेन्यासारख्या आहेत. सध्या सणवारचा महिना असल्यामुले आम्ही बरेच बिझी आहोत..आम्ही ह्या मागण्यानवर गहन विचार करून आमचा निर्णय दिवाली नंतर कळवू…या तुम्ही….

सौ शहाने : ठीक आहे …तुमच्याकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. बरीच कामे पडलीत घरी. आमच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्व सभासदानकडुन धन्यवाद. येतो आम्ही…

(त्यांचे हे संभाषण दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती दुरून कोणाच्या नकळत ऐकत असतात. परत जाणारया बायकाना गाठून. आणि काही तरी गहन सांगायचे म्हणुन त्याना आपल्या कक्षात घेवून जातात)

दुर्गा : आम्ही तिघिनी आपल्या मागण्या ऐकल्या. ज्या मागन्यांचा आम्ही विचार देखील केला नव्हता. त्या तुमच्या मागण्या ऐकून खरेच तुमचे कौतुक करावेसे वाटते. आणि तुमचा भुतालावारील पराक्रम तर वाखान्न्याजोगा आहे…
हे सर्व ऐकून आमच्यातली स्त्री जागी झाली आहे. आता ती माता,मुलगी,बहिन,पत्नी,सुन इ. सगळी नाते टाकुन देवून स्त्री म्हणुन जगणार आहे. त्यासाठी आमचा एक master plan आहे….
ह्या नवरात्र उत्सवातील सर्व सत्व पणाला लावून आम्ही स्वर्गलोकातील सर्व माता मंडळी आदी शक्तीच्या नेतृत्वाखाली स्वर्गलोकातील सर्व प्रस्थापितान्विरुध युध्य पुकारून दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर स्वर्गलोकावरील सत्ता काबीज करू…
आणि मग काय तुमच्या मागण्या आपण चुटकीसरशी पूर्ण करू….
मग भूतलावर अणि स्वर्गलोकावर फ़क्त स्त्रीजातीचेच राज्य…..आपले ‘कालियुग‘

द्या टाळी…
(सर्व एकसाथ) गर्व आहे आम्हाला स्त्री म्हणुन जन्माला आल्याचाजय हो…. 🙂

Advertisements
प्रवर्ग: विडंबन